Amazon Jobs : क्या बात है!! वर्षाला तब्बल दीड लाख नोकऱ्या मिळणार; Amazon भारतात करणार मोठी गुंतवणूक

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जगावरील आर्थिक मंदीच्या संकटामुळे (Amazon Jobs) अनेक प्रमुख कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच ट्विटर, मेटा यासह अ‍ॅमेझॉननेदेखील हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे. मात्र आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. अ‍ॅमेझॉन कंपनीने भारतात नवीन कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. काही  हजार जागांसाठी नव्हे तर जवळपास दीड लाख जागांसाठी भरती केली जाणार आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक समाधानकारक बातमी आहे. अ‍ॅमेझॉनही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आहे. जगातल्या सर्वांत प्रभावशाली कंपन्यांमध्ये अ‍ॅमेझॉनचा समावेश होतो.

अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिस म्हणजेच AWS 2023 पर्यंत भारतात क्लाउड-संबंधित पायाभूत सुविधांमध्ये जवळपास 1 लाख 5 हजार 600 कोटींची गुंतवणूक करणार आहे. क्लाउड सेवांसाठी ग्राहकांच्या (Amazon Jobs) वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कंपनी ही गुंतवणूक करणार असल्याची मोठी घोषणा कंपनीने केली आहे. अ‍ॅमेझॉनच्या या गुंतवणुकीमुळे देशात दरवर्षी अंदाजे सरासरी 1 लाख 31 हजार 700० नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिस 2030 पर्यंत भारतात क्लाउड संबंधित पायाभूत सुविधांमध्ये 1 लाख 5 हजार 600 कोटींची (12.7 अब्ज डॉलर) गुंतवणूक करणार आहे. क्लाउड (Amazon Jobs) सेवांसाठी ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी ही गुंतवणूक करत आहे. Amazon.com Inc च्या क्लाउड कंप्युटिंग विभागाने ही माहिती दिली आहे.
AWS ने 2016 आणि 2022 दरम्यान भारतात 3 अब्जपेक्षा जास्त गुंतवणूक केली, ज्यामुळे भारतीय व्यवसायांमध्ये वार्षिक 39,500 नोकऱ्या निर्माण होण्यास मदत झाली. AWS चे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), अ‍ॅडम सेलिपस्की म्हणतात; “AWS एक डिजिटल (Amazon Jobs) पॉवरहाऊस म्हणून भारताच्या वाढीसाठी दीर्घ काळापासून काम करत आहे. 2016 पासून आमच्या पायाभूत सुविधांमुळे मोठी प्रगती झाली आहे.”

इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारत एक उज्ज्वल स्थान राहिले आहे, जेथे व्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहेत. मला माहित आहे की सरकार 2025 पर्यंत ट्रिलियन-डॉलरची डिजिटल अर्थव्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, पुढील काही (Amazon Jobs) वर्षांत भारत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या मार्गावर आहे. या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारतासाठी क्लाउड तंत्रज्ञान स्वीकारणे महत्त्वाचे आहे, असे अ‍ॅडम सेलिपस्की यांनी म्हटलं आहे. दरम्यान, ही भरती कधी सुरु केली जाणार आहे याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. मात्र ती लवकरच सुरु केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com