All India Job : नोकऱ्यांची खैरात होणार!! ‘या’ सेक्टरमध्ये 7 लाख बेरोजगारांना मिळणार काम 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । येत्या काही दिवसात देशातील (All India Job) अनेक सेक्टर्समधील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या निर्माण होणार आहेत.  या सेक्टरमध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यात, म्हणजेच दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगार मिळण्याची शक्यता आहे. या सेक्टर्समधील अनेक कंपन्यांना कुशल मनुष्य बळ लागू शकते. या कंपन्या मोठ्या प्रमाणात कुशल आणि अकुशल कर्मचारी, कामगारांची भरती करण्याची दाट शक्यता आहे. देशातील दक्षिणेतील राज्यात अनेक परदेशी ब्रँड्स त्यांचे प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात कामगारांची गरज भासणार आहे. या वर्षात 2023 च्या नोव्हेंबरपर्यंत सणासुदीच्या काळात नोकऱ्यांचा अक्षरशः पाऊस पडणार आहे. तेव्हा बेरोजगार तरुणांनी यासाठी सज्ज रहायचं आहे कारण इथे अनुभवी आणि फ्रेशर्स दोघांनाही संधी मिळू शकते.

तब्बल 7 लाख नोकऱ्या निर्माण होणार
भारतात पुढील दोन महिन्यात ई-कॉमर्स, रिटेल, एफएमसीजी आणि लॉजिस्टिक या सेक्टर्समध्ये नोकऱ्या उपलब्ध होतील. एका अंदाजानुसार या क्षेत्रात जवळपास 7 लाख नोकऱ्या निर्माण होतील. त्यासाठी मुबलक प्रमाणात कुशल मनुष्यबळ आणि अकूशल कामगारांची गरज भासणार आहे. नोव्हेंबरपर्यंत या सेक्टरमध्ये नोकऱ्या उपलब्ध होण्याचा अंदाज आहे.

दक्षिण भारतात नोकरीसाठी जास्त पर्याय मिळणार (All India Job)
TeamLease सर्व्हिसेच्या नोकरीविषयक अंदाजानुसार, सर्वाधिक नोकऱ्या दक्षिण भारतात उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. या भागात 4 लाख कर्मचाऱ्यांना नोकऱ्या मिळू शकतात. दक्षिण भारतातील बेंगळुरु शहरात 40 टक्के, चेन्नईमध्ये 30 टक्के तर हैदराबाद या शहरात 30 नोकऱ्या मिळतील.

कोणाला मिळणार संधी
रिपोर्टनुसार, गिग वर्कर्ससाठी या नोकऱ्या असतील. यामध्ये फूड डिलिव्हरी कंपन्या, डोअर-टू-डोअर वस्तू पुरवठा कंपन्यांचा सर्वाधिक समावेश आहे. गिग वर्कर्सची सर्वाधिक संधी दक्षिणेतील राज्यांमध्ये आहे. आता उपनगरे आणि निम शहरी या भागात अशा करिअरची सर्वाधिक संधी (All India Job) आहे. यामध्ये कोईम्बतूर, कोची आणि म्हैसूर या शहरांचा समावेश आहे.
तसेच या नवीन नोकऱ्यांमध्ये 30 टक्के वॉशरहाऊस ऑपरेशन, लास्ट मिल डिलिव्हरी 60 टक्के, 10 टक्के कॉल सेंटर्समधील कर्मचाऱ्यांसाठी गेल्या वर्षाच्या तुलनेत गिग जॉबमध्ये 25 टक्के वाढ झाली आहे. तर दक्षिणेतील राज्यात या सेक्टरमध्ये 30 टक्क्यांहून अधिकची वाढ होण्याची शक्यता आहे.

फ्लिपकार्ट देणार 1 लाख जॉब्स
नुकतीच फ्लिपकार्टने बिग बिलियन डे आणि फेस्टिव्हल (All India Job) सीझनमध्ये 1 लाख नोकरी देण्याची घोषणा केली आहे. इंडस्ट्री अहवालानुसार, भारतात ग्राहकांचा खर्च 2030 पर्यंत 4 अरब डॉलरहून अधिक असेल. ई-कॉमर्स ई टेल इकोसिस्टमचे GMV या आर्थिक वर्षात 2023 मध्ये 22 टक्क्यांहून 60 अब्ज डॉलरवर पोहचले आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com