करिअरनामा ऑनलाईन । टाटा उद्योग समुहाच्या अखत्यारीत (Air India Layoff) येणाऱ्या विमानसेवा पुरवणाऱ्या एअर इंडिया आणि विस्तारा या दोन्ही कंपन्यांमध्ये विलिनीकरणाची प्रक्रिया सुरु आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस या दोन्ही कंपन्यांमध्ये सुरु असणारी ही विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते; अशी शक्यता आहे. एकीकडे विलिनीकरणाची प्रक्रिया सुरु असतानाच दुसरीकडे जवळपास 600 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात येण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.
स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय दिला जाणार
एअर इंडियाकडून या संभाव्य 600 कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. PTI च्या माहितीनुसार हे 600 कर्मचारी विमानाच्या उड्डाण प्रक्रिया (Air India Layoff) विभागातील नसल्याचं सांगण्यात आलं आहे. या प्रक्रियेदरम्यान वैमानिक किंवा केबिन क्रू यांच्या नोकरीला कोणताही धोका नसल्यासं म्हटलं जात आहे.
कर्मचाऱ्यांपुढं नोकरीचा प्रश्न उभा राहू नये म्हणून…
एअर इंडियामधून नोकरी गमावणाऱ्या किंवा स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांपुढं नोकरीचा प्रश्न उभा राहू नये यासाठी आणि कर्मचाऱ्यांचं हित लक्षात घेता टाटा समुहाच्या अखत्यारीत येणाऱ्या इतर कंपन्यांमध्ये त्यांना नोकरी दिली जाऊ शकते. नोकरी न मिळाल्यास समुहापासून स्वेच्छेनं विभक्त होण्यासाठी त्यांना एक खास रक्कम समुहाकडून दिली जाणार आहे. या प्रक्रियेसाठी सध्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची पदं आणि त्यांच्या कामाच्या स्वरुपासह त्यांच्या जबाबदाऱ्यांचा आढावा घेतला जात आहे.
एअर इंडियात किती कर्मचारी काम करतात? (Air India Layoff)
सध्याच्या घडीला एअर इंडियामध्ये जवळपास 23,000 कर्मचारी सेवेत आहेत. हा आकडा त्याहीपेक्षा मोठा असल्याचं सांगितलं जातं. येत्या काळात विमानसेवा क्षेत्रामध्ये एअर इंडियाला आणखी कार्यक्षम करण्याच्या हेतूनं कंपनीकडून या विलिनीकरणाची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांवर या प्रक्रियेचा परिणाम होणार असला तरीही नेमका किती कर्मचाऱ्यांवर हा प्रभाव दिसेल यासंबंधिचा निश्चित आकडा समोर आलेला नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com