करिअरनामा ऑनलाईन | केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेबाबत मोठा गदारोळ झाला आहे. विद्यार्थ्यांच्या (Agnipath Yojana) विरोधानंतर सरकारने भारतीय सैन्यदलाचे भवितव्य डोळ्यासमोर ठेवून या योजनेत अनेक मोठे बदल केले आहेत. मात्र तरीही या योजनेला देशभरात विरोध होताना दिसून येतो आहे. मात्र आता या योजनेचं समर्थन करत नॅशनल सेक्युरिटी ऍडव्हायझर (NSA) अजित डोभाल यांनी एक मोठं विधान केलं आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अग्निपथ योजनेवर (Agnipath Yojana) अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ते म्हणाले; “भारतात आजूबाजूचे वातावरण बदलत आहे. काल आपण जे करत होतो, तेच भविष्यातही करत राहिलो तर आपण सुरक्षित राहूच असे नाही. उद्याची तयारी करायची असेल तर बदलावे लागेल. त्यामुळे ही योजना येणं आवश्यक आहे.”
“गेल्या 8 वर्षात अनेक संरचनात्मक सुधारणा झाल्या आहेत. CDS चा प्रश्न 25 वर्षांपासून प्रलंबित होता. राजकीय इच्छाशक्तीअभावी त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. आज आपल्या संरक्षण संस्थेची स्वतःची स्वतंत्र एजन्सी आहे. रेजिमेंटच्या (Agnipath Yojana) तत्त्वाशी कोणतीही छेडछाड होणार नाही, त्या रेजिमेंट आहेत त्या कायम राहतील. अग्निवीर हे संपूर्ण सैन्य कधीच एकटे राहणार नाही, अग्निवीर हे फक्त पहिल्या 4 वर्षात भरती झालेले सैनिक असतील. उरलेल्या सैन्यात बहुतांश अनुभवी लोक असतील. जे अग्निवीर नियमित (4 वर्षानंतर) असतील त्यांना जवळचे प्रशिक्षण दिले जाईल. बदलत्या काळानुसार लष्करात बदल करणे गरजेचे असल्याचे अजित डोवाल यांनी मुलाखतीत सांगितले. याकडे एका दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. अग्निपथ ही एक स्वतंत्र योजना नाही;” असंही अजित डोवाल यांनी म्हंटलं आहे .
अग्निपथ आंदोलनात नेमका कोणाचा हात? (Agnipath Yojana)
याशिवाय अग्निपथ योजनेच्या निषेधावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल म्हणाले की, अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन करण्यामागे नेमका कोणाचा हात आहे हे तपासानंतर सांगता येईल. योग्य तपासानंतर आपण सांगू शकतो की यामागे कोणाची शक्ती होती. याची सखोल चौकशी झालीच पाहिजे.
अग्निपथ योजनेची अधिसूचना जारी –
केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेंतर्गत लष्करात अग्निवीरांच्या भरतीसाठी सोमवारी अधिसूचना जारी करण्यात आली. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, भरतीसाठी होणाऱ्या भरतीची (Agnipath Yojana) नोंदणी जुलैपासून सुरू होणार आहे. इच्छुक अर्जदार JOININDIANARMY.NIC.IN वर जाऊन नोंदणी करू शकतात. अग्निपथ योजेनच्या अधिसूचनेनुसार 8 वी आणि 10 वी उत्तीर्ण युवक यामध्ये अर्ज करू शकतात. योजनेअंतर्गत अग्निवीरांची चार वर्षांसाठी भरती केली जाईल. त्यांना पेन्शन किंवा पदवी मिळणार नाही.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com