Aanchal Singh : 12 वर्षे काम करूनही ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर आली घरी बसण्याची वेळ; असं काय घडलं?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । क्षेत्र कोणतेही असो बेरोजगारीचे दुखणे कमी (Aanchal Singh) होत नाही. बॉलीवूडसाठी ही गोष्ट नवीन नाही. सिने जगतात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या अनेक कलाकारांना आता चित्रपटसृष्टीत काम मिळत नाहीये. एका प्रसिद्ध अभिनेत्री सोबत देखील सध्या हेच घडत आहे. तब्बल 12 वर्षे काम करूनही ती आज बेरोजगार झाली आहे. एक पोस्ट शेअर करत तिनं चाहत्यांना याविषयी सांगितलं आहे. हि अभिनेत्री आहे आंचल सिंग. आंचल सिंग गेल्या 12 वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. गेल्या 6 महिन्यांपासून आंचल कामाच्या शोधात आहे पण तिला काम मिळत नाहीये. आंचलने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती दिली आहे. आंचलने तिची व्यथा सांगताना तिचा अनुभव शेअर केला आहे.

Aanchal Singh

आंचलने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “दररोज लोक मला विचारतात की मी काय करते आहे किंवा मी राउंडटेबल्सचा भाग का नाही किंवा मला माझ्या कामासाठी नामांकित का केलं जात नाही? ज्यांना या सगळ्यामध्ये रस आहे, त्यांच्यासाठी हे उत्तर; “गेल्या सहा महिन्यांपासून मला जास्तीत (Aanchal Singh) जास्त २ वगळता कोणत्याही चित्रपट किंवा वेब सीरिजसाठी ऑडिशन देण्यास बोलावण्यात आलं नाही. मी फोन करून चौकशी केली तेव्हा मला सांगण्यात आले की सध्या कोणतेही काम होत नाहीये.”

ती पुढे म्हणते; “मी माझ्या आयुष्यातील 12 वर्षे इंडस्ट्रीला दिली आहेत आणि 400 टीव्ही जाहिराती केल्या आहेत. मी पंजाबी, तमिळ आणि श्रीलंकन ​​चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अशातच, मी स्वतःहून काही चित्रपट सोडले. मी ‘अनदेखी’ नावाची (Aanchal Singh) वेब सीरिज केली. पण 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ये काली काली आंखे’ मुळे मला खरी ओळख मिळाली. हा एक प्रोजेक्ट होता जो मला खूप आवडला होता. या प्रोजेक्टने मला ओळख मिळवून दिली, त्यासाठी मी कायम आभारी असेन.

 

Aanchal Singh

आंचल शेवटी म्हणते; “सत्य कडू असतं. पण एवढं करूनही मी घरी बसून आहे. माझ्याकडे काम नाही. या गोष्टीचा मला त्रास होतो आणि मी निराश होते. वर्षाचा शेवट आहे आणि मी माझ्या कुटुंबासोबत खऱ्या प्रेमाचा आनंद घेत आहे,” असं आंचलने तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय.

आंचल सिंग विषयी जाणून घेवूया… (Aanchal Singh)

आंचल चा जन्म 5 एप्रिल 1992 रोजी झाला. तीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. आंचल जवळपास 12 वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. आंचलने 400 हून अधिक जाहिरातींमध्ये काम केले आहे.

आंचल सिंग या वर्षी 2 वेबसीरिजमध्ये दिसली आहे. तिची (Aanchal Singh) वेबसीरिज प्रचंड गाजली. त्याच वेळी, ये काली कली झुल्फेन या वेबसिरीजमधील आंचलच्या कामाचे खूप कौतुक झाले. आंचल सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर आंचलचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com