करिअरनामा ऑनलाईन | सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी आवश्यक असलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा, अर्थात ‘सेट परीक्षा’ ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यापीठामार्फत घेतली जाते. यावर्षीच्या परीक्षेसाठी अर्जाच्या शुल्कामध्ये वाढ केली आहे. करोणाच्या दुसऱ्या लाटेमध्ये पालकांची आणि विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कोलमडली असतानाही विद्यापीठाने असा अविचारी निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यावर तात्काळ शुल्कवाढ रद्द करण्याची विविध विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाकडे मागणी केली आहे.
गेल्या शैक्षणिक वर्षांमध्ये सेट परीक्षेच्या अर्जासाठी आकारली जाणारी फी ही खुल्या प्रवर्गासाठी 600 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 450 रुपये इतकी होती. या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षेसाठी विद्यापीठाने या अर्ज शुल्कामध्ये वाढ करून, आता खूल्या वर्गासाठी 800 रुपये व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 650 रुपये इतकी फी इतके शुल्क ठेवण्यात आले आहे. यावर विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. “करोणाच्या काळामध्ये आर्थिक परिस्थिती खराब असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याऐवजी विद्यापीठाने सेट परीक्षेच्या अर्जासाठी शुल्कवाढ करणे म्हणजे, विद्यार्थ्यांवर अन्याय करणे आणि विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवण्यासाठी पाऊल आहे. यावर विद्यापीठातील सिनेट मेंबर काहीच कसे बोलत नाहीत? त्यांचीही या निर्णयाला मूकसंमती आहे का? यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे” अशी प्रतिक्रिया स्टुडन्ट हेल्पिंग हॅन्ड संघटनेचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी ‘करियर नामा’शी बोलताना दिली.
बाहेरील राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये सेट परीक्षेचे शुल्क कमी असताना पुणे विद्यापीठाने शुल्क कमी करण्याऐवजी वाढवल्यामुळे विद्यार्थी नाराज आहेत. यावर, ‘सेट परीक्षेच्या शुल्कासंदर्भात नेमलेल्या शिफारशीनुसार समितीच्या शिफारशीनुसार तब्बल बारा वर्षानंतर सेट परीक्षेच्या अर्ज शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतके शुल्क आकारण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला’. असे स्पष्टीकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाने दिले आहे.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com