करिअरनामा ऑनलाइन | करोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये परीक्षा, सुट्टी याबाबत निर्णय आहेत. राज्यातील शाळांना 1 मे पासून 13 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सोबतच, सन 2021-22 चे शैक्षणिक वर्ष 14 जूनपासून सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
मागील वर्षीही करोणामुळे शैक्षणिक वर्षामध्ये बदल करावा लागला होता. 2020-21 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 15 जून पासून करण्यात आली होती. मात्र वर्षभर करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामूळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंदच ठेवण्यात आली होती. ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले होते. पहिली ते अकरावीच्या परीक्षा ही रद्द करण्यात आलेल्या आहेत. ऑनलाईन शिक्षणालाच प्राधान्य देण्यात आले होते. सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना पास करून पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय ही घेण्यात आलेला आहे. यामुळे शिक्षण खात्यातील या निर्णयाची चर्चा होत आहे.
उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याची मागणी अनेक संगठना आणि पालकांनी संबंधित शाळेला केली होती. मागणी मान्य करण्यात आली असून सुट्टी जाहीर करण्यात आले आहे. यामुळे उन्हाळा सुट्टी संदर्भात असलेला संभ्रम यामुळे दुर होणार आहे. इतर शाळा 14 जून पासून सुरू होतील मात्र विदर्भातील शाळा 28 जून पासून सुरू करण्यात येतील.