Breaking News : 10 वी, 12 वी परिक्षा पुढे ढकलली; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाइन | राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कडून 10वी आणि 12 वी च्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली. राज्य सरकारच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान 10 वी ची परीक्षा जून मध्ये तर 12 वीची परीक्षा मे महिन्यात होईल. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता बोर्डाच्या परीक्षेविषयी काही पालकांत व विद्यार्थ्यांत अस्वस्थता आहे,याची मला पूर्ण कल्पना आहे. असे वर्षा गायकवाड यांनी म्हंटल. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला.

यापूर्वी पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तसेच एमपीएससी परीक्षा देखील काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यात कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असून खबरदारी म्हणून राज्य शासनाकडून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत