सुरक्षा दलात नोकरीची सुवर्ण संधी, दरमहा ८१,१०० रुपये पगार, अर्जाचा आज शेवटचा दिवस

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) जीडी हेड कॉन्स्टेबलच्या पदांसाठी अर्ज मागविले आहेत. सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवार अधिसूचनेनुसार अंतिम तारखेपूर्वी अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. आज आम्ही यासंदर्भात महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. ज्या तुम्हाला अर्जाच्या वेळी सुविधा देतील. चला तर मग त्यासंबंधित माहितीबद्दल जाणून घेऊया.

शैक्षणिक पात्रता – दहावी / बारावी किंवा समकक्ष.

पदांची संख्या – 300 पोस्ट.

पदाचे नाव – जीडी हेड कॉन्स्टेबल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 17/12/2019

वय मर्यादा – उमेदवाराचे वय 23 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

वेतनमान- विभागाच्या म्हणण्यानुसार, दरमहा पगार 25,500 – 81,100 रुपये असेल.

निवड प्रक्रिया – क्रीडा स्पर्धांमधील कामगिरी, चाचणी, प्रवीणता तपासणी, गुणवत्तेद्वारे अंतिम निवड, वैद्यकीय चाचणीतील कामगिरीनुसार निवड केली जाईल.

अर्ज फी – सामान्य / ओबीसीसाठी 100 रुपये आणि अनुसूचित जाती / जमातीसाठी विनामूल्य.

अर्ज करण्याची प्रक्रिया – अधिसूचनेनुसार अर्ज ऑनलाईन करावे लागतील.

अधिकृत वेबसाईट – https://www.cisfrectt.in/

अधिक माहितीसाठी – https://careernama.com/