करिअरनामा ऑनलाईन ।सरकारी नोकरीकडे तरुणांचा कल वाढत आहे. बरेच तरुण 12 वी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात करतात. तरुणांना तयारी करताना केवळ अर्ज आणि परीक्षेची प्रतीक्षा असते. आता ITI पास तरुणांसाठी नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. बीईएल, एसएससी, एएआय, डीआरडीओ, एनएचपीसी, यूपी पॉवर कॉर्पोरेशन यासह अनेक विभागांमधील बंपर नोकरभरती निघालीय. (Government Jobs 2021)
ITI तरुणांसाठी नोकरीची उत्तम संधी; 547 पदांवर निघाली भरती
ITI कडून सिव्हिल, मेकॅनिकल आणि आर्किटेक्चरमधील पदविधारकांसाठी ही एक उत्तम नोकरीची संधी आहे. ही संधी तुम्हाला पंजाबमध्ये मिळणार आहे. जेथे आयटीआय डिप्लोमा धारकांची 547 पदे भरती करण्यात येणार आहेत. पंजाब सबॉर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डने (PSSSB) कनिष्ठ ड्राफ्ट्समनच्या ITI मधून सिव्हिल, मेकॅनिकल आणि आर्किटेक्चरमधील पदविधारकांच्या अधिकृत संकेतस्थळावर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार sssb.punjab.gov.in वर 11 फेब्रुवारी 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. नोंदणी फी जमा करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – sssb.punjab.gov.in
पंजाबमध्ये विविध नोकरीसाठी अर्ज करा – click here
बीईएलमध्ये नोकरीची संधी –
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या नवरत्न कंपनीच्या सार्वजनिक क्षेत्रातील भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड अर्थात बीईएलच्या विविध पदांवर अनेक पदांसाठी शासकीय भरती चालू आहे. बीईएलने बंगळुरू विभागात आणि बीईएलच्या कॉर्पोरेट कार्यालयात सुरक्षा अधिकारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, कनिष्ठ पर्यवेक्षक सुरक्षा आणि हवालदार या पदांवर भरतीसाठी जाहिरात दिली आहे.Government Jobs 2021
अधिकृत वेबसाईट – https://www.bel-india.in/
UPPCL JE Vacancy 2021 : कनिष्ठ अभियंता पदासाठी मागविले अर्ज
उत्तर प्रदेशात केवळ ऑनलाईन चाचणीच्या आधारे सरकारी नोकरी मिळू शकते. उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज मागविले आहेत. अर्ज प्रक्रिया 3 फेब्रुवारी 2021 पासून सुरू होईल. विशेष म्हणजे या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेच्या आधारे केली जाईल.
अधिकृत वेबसाईट – http://www.uppcl.org
ECIL मध्ये अभियांत्रिकी पदवीधरांसाठी नोकरी
ECIL Recruitment 2021 – ECILने तांत्रिक अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक उमेदवार 31 जानेवारी 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे या नोकरीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही आणि तुमची निवड देखील मुलाखतीच्या आधारे केल.Government Jobs 2021
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – http://www.ecil.co.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com