करीअरनामा आॅनलाईन | जिओला फाईट देण्यासाठी आता बिएसएनएल सरसावलं आहे. बीएसएनएलने आपल्या नेटवर्कचा विस्तार करताना एक नवीन प्लॅन आणला आहे. 1,999 रुपये किमतीचा हा प्लॅन रिलायन्स जिओच्या JioFiber नंतर लगेच बाजारात उतरवण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 33 जीबी डेटा मिळणार असून अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे.
हा नवीन प्लॅन 849 रुपये/ 1,277 रुपये/ 2,499 रुपये/ 4,499 रुपये/ 5,999 रुपये/ 9,999 रुपये आणि 16,999 वाल्या या सर्व प्लॅन्सबरोबर तुम्हाला उपलब्ध करून दिला जाणार आहे. बीएसएनएलच्या या प्लॅनचा सामना हा एयरटेल V-Fiber च्या 1,999 तसेच JioFiber च्या 2,499 वाल्या प्लॅनबरोबर राहणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला प्रतिदिन 100 Mbps च्या वेगाने ३३ जीबी डेटा मिळणार आहे. त्यानंतर याचा स्पीड हा 4 Mbps इतका होणार आहे. यामध्ये तुम्हाला अधिक वेग मिळणार असून रिलायन्सच्या JioFiber मध्ये देखील तुम्हाला 3 Mbps मात्र बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 4 Mbps स्पीड मिळणार आहे. डेटा बरोबरच तुम्ही या प्लॅनमध्ये देशभरात कुठेही फोन लावू शकता. कंपनीच्या लॅण्डलाइनवरून तुम्ही देशभरात कुठेही फोन करू शकता.
दरम्यान, या प्लॅनबरोबरच बीएसएनएलचा 1,277 रुपये आणि 2,499 रुपये किमतीचा देखील ब्रॉडबँड प्लॅन उपलब्ध आहे. मात्र जिओने नुकत्याच लाँच केलेल्या 2,499 रुपयांच्या प्लॅनपेक्षा हा प्लॅन स्वस्त आणि सर्वात उत्तम असून यामध्ये तुम्हाला त्याच प्रकारची सेवा मिळणार आहे.