CET Cell कडून तंत्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।राज्याच्या सामायिक प्रवेश कक्षाकडून (CET Cell) तंत्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. इंजिनीअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, एमसीए आणि एमटेक या अभ्यासक्रमांसाठी हे वेळापत्रक लागू करण्यात आले.तसेच प्रवेशप्रक्रियेसाठी ५ फेब्रुवारी ही अंतिम तारीख आहे. प्रवेशाच्या सुधारित वेळापत्रकानुसार २१ जानेवारीपासून कॉलेज सुरू होणार आहेत.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने या विद्यार्थ्यांना खुला गट किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (इडब्ल्यूएस) या प्रवर्गातून प्रवेश घेण्यास सांगण्यात आले. परंतु यासाठी विद्यार्थ्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. त्यानुसार २० जानेवारीपर्यंत विविध कागदपत्रे सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर हे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

प्रवेशप्रक्रिये संबंधित सविस्तर –

पहिल्या फेरीत जाहीर झालेल्या जागेवरील प्रवेश आता २० जानेवारी रोजी दुपारी तीनपर्यंत विद्यार्थी त्यांच्या लॉग इनमधून मान्य करू शकतील किंवा स्वीकारू शकतील. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून विद्यार्थ्यांना २० जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपला प्रवेश निश्चित करता येईल. २१ जानेवारी रोजी दुसऱ्या फेरीसाठी शिल्लक जागांचा तपशील प्रसिद्ध होईल. २१ ते २३ जानेवारीदरम्यान विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदवता येतील. २५ जानेवारी रोजी दुसऱ्या फेरीचे प्रवेश जाहीर होतील. २६ ते ३० जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना आपल्या लॉगइनमधून प्रवेश मान्य करता येईल. २७ ते ३० जानेवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना संबंधित संस्थेत शुल्क भरून व कागदपत्रे जमा करून प्रवेश निश्चित करता येईल.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com