राज्यात शैक्षणिक वर्ष जूनऐवजी जानेवारीपासून सुरु करण्याचा विचार….

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारने जाहीर केलेले नवीन शिक्षण धोरण राबविण्यासाठी राज्याचे सर्व विभागातील शिक्षण तज्ञ आणि अभ्यासकांची समिती तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.यासंदर्भात नवीन शिक्षण धोरणाबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,केंद्र सरकारने केवळ नवीन शिक्षण धोरण जाहीर केले आहे. राज्यातील सर्व विभागातील प्रतिनिधित्व करणारे तज्ञ आणि संशोधक यांची अभ्यास समिती तयार करून धोरणाच्या बाबतीत विचार करणे योग्य ठरेल. नवीन शिक्षण धोरणात विविध संकल्पना आहेत. त्याबाबत राज्य सरकारला कायद्यात बदल करावे लागतील. काही आवश्यक नियम बदल्याशिवाय नवीन नियम लागू होणार नाहीत. या बैठकीस शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड , उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सावंत , पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नवीन शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरु होते,परंतु कोरोना पार्श्ववभूमीमुळे आता आपण केंद्र सरकारशी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत नवीन शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासाठी चर्चा केली पाहिजे. राज्यातील 100 टक्के विद्यार्थ्यांना शक्य तेवढे ऑनलाईन किंवा ऑफलाईन शिक्षण दिले पाहिजे, असे बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात 3 महिन्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. लवकरच ऑक्टोबर महिन्यात या बदलेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन तसेच ऑनलाईन , ऑफलाईन निकालांचा आढावा घेण्यात येईल. असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या. राज्यात अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया पद्धतशीरपणे आहे. या बैठकीत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी काही थेट शाळा सुरु करण्याच्या शक्यतेवरही  चर्चा झाली.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com