Pavitra Portal Registration 2025: शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करियरनामा ऑनलाईन। (Pavitra Portal Registration 2025) राज्यातील बीएड धारक आणि शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला २० जानेवारीपासून अधिकृतपणे सुरुवात केली आहे. यासाठी पवित्र पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे, शिक्षक पदांसाठी लांबणीवर पडलेल्या उमेदवारांना एक सुवर्णसंधी मिळाली आहे.

जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठी भरती

जिल्हा परिषदांच्या शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांची संख्या पुरेशी आवश्यक असून येणाऱ्या काळात सेमी इंग्रजीचे वर्ग देखील या शाळांमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे. जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांची संख्या आवश्यक आहे. (Pavitra Portal Registration 2025) यासाठी शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणार आहे. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या रोस्टरबद्दल अनेक तक्रारी होत्या, त्या अडचणी दूर केल्यानंतर आता राज्यात शिक्षकांची भरती लवकरच होईल.

“शालेय शिक्षण हे आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण मिळावे, यासाठी आमचा कायम आग्रह आहे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी राज्यातील शाळांमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल”, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मुंबईत दिली.

शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सक्रिय

शिक्षण विभागाने शासनाकडे 14 ते 15 हजार शिक्षकांची भरती करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, शासनाने संबंधित संस्थांकडून जाहिरात मागवली असून, शिक्षक पदांवर अर्ज सादर करण्यासाठी पवित्र पोर्टलवर 20 जानेवारीपासून जाहिराती सुरू होणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना शिक्षक पदांसाठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती.पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 21 हजार 678 जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. (Pavitra Portal Registration 2025) आता दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीची कार्यवाही सुरू होणार आहे. या पदभरती करीता शासन निर्णय दि. 10 नोव्हेंबर 2022 नुसार कार्यवाही करावयाचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी 14 जानेवारी 2025 पासून पवित्र पोर्टलवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया चालवण्यास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. यामुळे शिक्षण संस्थांना त्यांच्या रिक्त शिक्षक पदांसाठी जाहिरात नोंदवण्यासाठी पोर्टलची सुविधा 20 जानेवारीपासून उपलब्ध झाली आहे.

अपात्र, गैरहजर आणि रुजू न झालेल्या उमेदवारांच्या जागा भरल्या जातील. (Pavitra Portal Registration 2025)

दुसऱ्या टप्प्यात, जिल्हा परिषदेकडे उर्वरित 10 टक्के रिक्त पदे, पहिल्या टप्यातील अपात्र, गैरहजर, रुजू न झालेल्या उमेदवारांची जागा आणि इतर रिक्त जागा भरण्यासाठी देखील जाहिराती दिल्या जातील. यासंबंधी सर्व जिल्हा परिषदांना 13 सप्टेंबर 2024 रोजी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, जिल्हा परिषदांकडील बिंदुनामावली विषयक माहितीचे प्रमाणपत्र या कार्यालयास उपलब्ध करुन देण्याचेही कळविण्यात आले आहे. सदर माहिती तात्काळ या कार्यालयास सादर करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र राज्य शिक्षण आयुक्तालयाकडून विभागीय शिक्षणाधिकारी, जिल्हा व तालुकास्तरावरील शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं आहे.

शिक्षक पदभरतीच्या या दुसऱ्या टप्प्यामुळे राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर भरती होईल, अशी अपेक्षा आहे. उमेदवारांनी वेळेवर आणि योग्य प्रकारे अर्ज भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

हे पण वाचा NHM Pune Recruitment 2025: NHM पुणे अंतर्गत 68 पदांची भरती; पात्रता काय? अर्ज कसा कराल?