Top 3 MSW Colleges: सामाजिक कार्याचं शिक्षण घ्यायचंय? ही आहेत TOP 3 कॉलेजेस; प्रवेश प्रक्रियासह संपूर्ण माहिती पहा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करियरनामा ऑनलाईन। सध्याच्या स्पर्धेच्या युगात अनेक करिअरच्या वाटा तयार झाल्या आहेत. आयटी, डॉक्टर्स आणि इंजिनीयर होण्यासाठी अनेकजण तयारी करत असतात. मात्र काहीजण समाजाशी असणारा आपला कनेक्ट जपत सामाजिक क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रयत्न करत असतात. (Top 3 MSW Colleges) त्यांच्यासाठी एमएसडब्ल्यू (MSW) हा अत्यंत उत्तम करिअरचा पर्याय आहे. हा कोर्स विद्यार्थ्यांना समाजातील विविध समस्या समजून त्यावर काम करण्यासाठी आवश्यक असलेली व्यावसायिक कौशल्ये शिकवतो. या कोर्समध्ये मुख्यतः ग्रामीण आणि शहरी समुदाय, मानसिक आरोग्य, कुटुंब कल्याण, बालकल्याण, धोरण आणि प्रकल्प व्यवस्थापन या विषयांचा समावेश आहे. पदवीनंतर MSW साठीच्या मास्टर्स साठी देशातील टॉपचे कॉलेजेस कोणते आहेत? आपण तिथे कसं जाऊ शकतो? ते खाली दिलेल्या माहितीतून जाणून घ्या.

भारतातील टॉप 3 एमएसडब्ल्यू कॉलेजेस

1) टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई हे भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रमुख सामाजिक कार्य संस्थांपैकी एक आहे. 1936 साली स्थापन झालेलं TISS हे सामाजिक कार्य, शैक्षणिक, आणि मानवाधिकार क्षेत्रातील उत्कृष्ट शैक्षणिक संस्थेच्या रूपात ओळखले जाते.TISS हे समाजिक कार्य, शिक्षण, मानव संसाधन व्यवस्थापन, महिला अभ्यास, सार्वजनिक धोरण, मानसिक आरोग्य आणि अनेक इतर सामाजिक शास्त्र विषयांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहे. या संस्थेचा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक नसतो, तर विद्यार्थ्यांना समाजातील प्रत्यक्ष परिस्थितीशी जोडून देणारा आहे.

स्पेशलायझेशन्स (Top 3 MSW Colleges) :

• समुदाय संघटन आणि विकास (Community Organization and Development Practice)

• वैद्यकीय आणि मानसिक सामाजिक कार्य (Medical and Psychiatric Social Work)

• मानव संसाधन व्यवस्थापन आणि श्रमिक संबंध (Human Resource Management and Labour Relations)

• समाजसेवा धोरण आणि विकास (Social Work in Policy and Development)

• समाजसेवा आणि सामाजिक उद्योजकता (Social Work and Social Entrepreneurship)

प्रवेश प्रक्रिया:

TISSNET (टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस नॅशनल एंट्रन्स टेस्ट) द्वारे प्रवेश घेतला जातो. त्यानंतर व्यक्तिगत मुलाखत (PI) आणि पूर्व-मुलाखत चाचणी (PIT) घेतली जाते.

मुख्य वैशिष्ट्ये :

• उत्कृष्ट प्राध्यापक आणि सामाजिक कार्यामध्ये अनुभव असलेले मार्गदर्शक.

• शैक्षणिक ज्ञान आणि क्षेत्र कार्यामध्ये मजबूत समन्वय.

• चांगली प्लेसमेंट आणि अल्मनी नेटवर्क.

2) दिल्ली स्कूल ऑफ सोशल वर्क (DSSW), दिल्ली विद्यापीठ

दिल्ली 1946 मध्ये स्थापित झालेल्या या शाळेचे उद्दिष्ट आहे सामाजिक कार्यातील उत्कृष्टतेसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणे. DSSW आपल्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी आणि समाजातील विविध समस्यांवर काम करणारे व्यावसायिक तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे संस्थान सामाजिक कार्य, कुटुंब कल्याण, मानसिक स्वास्थ्य, आणि विकास क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. (Top 3 MSW Colleges)

स्पेशलायझेशन्स:

• कुटुंब कल्याण (Family and Child Welfare)

• वैद्यकीय आणि मानसिक सामाजिक कार्य (Medical and Psychiatric Social Work)

• समाजसेवा धोरण आणि विकास (Social Work in Policy and Development)

• समाजसेवा आणि शहरी विकास (Social Work in Urban Development)

• श्रम कल्याण आणि संस्थागत सेवा (Labour Welfare and Institutional Services)

प्रवेश प्रक्रिया:

दिल्ली विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेद्वारे (DU MSW Entrance Exam) प्रवेश मिळवला जातो, त्यानंतर मुलाखत घेतली जाते.

मुख्य वैशिष्ट्ये:

• सामाजिक कार्याच्या तत्त्वज्ञानाचा आणि व्यावहारिक वापराचा समन्वय.

• समाजातील विविध समुदायांसोबत काम

• राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय NGO, शासकीय संस्थांमध्ये चांगली प्लेसमेंट.

3) आझिम प्रेमजी युनिव्हर्सिटी (APU) बंगलोर

आझिम प्रेमजी युनिव्हर्सिटी (APU) बंगलोर, भारतातील एक प्रतिष्ठित खाजगी विद्यापीठ आहे, जे 2010 मध्ये स्थापन झाले. या विद्यापीठाचे उद्दिष्ट सामाजिक बदलाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यावसायिकांना तयार करणे आहे. APU विशेषतः सामाजिक कार्य, शिक्षण आणि कायदा या क्षेत्रांमध्ये उच्च दर्जाचे शैक्षणिक अभ्यासक्रम देत आहे. युनीव्हर्सिटीचे मिशन म्हणजे योग्य ज्ञान, कौशल्ये आणि मूल्ये असलेले लोक तयार करणे जे समाजाच्या सर्वसमावेशक विकासासाठी योगदान देऊ शकतात.

स्पेशलायझेशन्स:

• समुदाय विकास (Community Development)

• बालकल्याण (Child Welfare)

• महिला सशक्तीकरण (Women Empowerment)

• मानसिक स्वास्थ्य (Mental Health)

• सामाजिक धोरण आणि परिवर्तन (Social Policy and Change)

प्रवेश प्रक्रिया:

Azim Premji University मध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटीची प्रवेश परीक्षा (एपीयू एन्ट्रन्स टेस्ट) देणे आवश्यक आहे. त्यानंतर शॉर्टलिस्टेड विद्यार्थ्यांना मुलाखत (Personal Interview) दिली जाते. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची अकादमिक तयारी, सामाजिक कार्याबद्दलची समज आणि असलेल्या दृषटिकोनाची तपासणी केली जाते.

मुख्य वैशिष्ट्ये:

• आधुनिक शैक्षणिक दृष्टिकोन

• प्रॅक्टिकल प्रशिक्षण

• सामाजिक भागीदारी

• सशक्त प्लेसमेंट

TISS, DSSW, APU हे कॉलेजेस सर्व उच्च दर्जाचे एमएसडब्ल्यू मास्टर डिग्री विद्यार्थ्याना देत आहेत. जे अनुभवयुक्त प्राध्यापक, आणि क्षेत्र कार्यातील संधी यावर आधारित आहेत. हे कॉलेजेस सोशल वर्क, मानवाधिकार, समुदाय विकास, मानसिक स्वास्थ्य, आणि सामाजिक कल्याण या क्षेत्रांमध्ये करिअर घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहेत.

अशाच करिअर महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

हे पण पहा – Bombay High Court Recruitment 2025: मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदाच्या 64 जागा; असा करा अर्ज