CBSE Pattern: मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न लागू होणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करियरनामा ऑनलाईन। नवीन वर्षात नवे सरकार स्थापन झाले आणि आता नवीन शिक्षण पद्धती देखील रुजू होणार असल्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाने बदलत्या काळानुसार अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असेल तरी, त्यामधील सर्वात मोठा निर्णय ठरू शकतो, सर्व शाळांमध्ये CBSE पॅटर्न सुरू करण्याचा. (CBSE Pattern) स्पर्धात्मक युगात राज्यातील येणारी पिढी मागे राहू नये, यासाठी सर्व सरकारी शाळांतून सीबीएससी बोर्डाचा पॅटर्न लागू करण्यात येणार असल्याचे संकेत सरकारकडून देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणावर महत्वपूर्ण भाष्य केलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मंत्रालयातील सर्व विभागाच्या पुढील 100 दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेतली. त्यामध्ये शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काही महत्वाचे निर्देश दिले. त्याचबरोबर शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार असल्याचा विश्वास देखील व्यक्त केला. शिक्षण विभागाने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पाऊले उचलावीत असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने 100 दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काही महत्वाच्या सूचना दिल्या.

त्यानुसार राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई (CBSE) पॅटर्नचा सुरू करून त्यात गरजेनुसार आवश्यक बदल करण्यासंदर्भातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी माध्यमांशी संवाद साधताना याबद्दलची माहिती दिली.

सीबीएसई पॅटर्न (CBSE Pattern) सुरू करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करणे, शाळांना गुणवत्तेनुसार रँकिंग देणे, एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण व्यवस्था निर्माण करून त्या शाळा आदर्श तर त्यातील एक वर्ग स्मार्ट वर्ग करणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

त्यामुळे, राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमध्ये सुधारणा करण्यावर पुढील 100 दिवसांत शासनाकडून जोर देण्यात येत असल्याचे दिसून येते. केंद्रीय शिक्षण पद्धतीचा गरजेनुसार अवलंबही केला जाईल. चालू वर्षात पहिलीच्या वर्गात सीबीएसई पॅटर्नचा विचार आपण करत आहोत, पुढच्या टप्प्यात सीबीएससी पॅटर्नच्या ज्या चांगल्या बाबी आहेत, त्या आपण शाळांमध्ये घेऊ, असे दादा भुसे यांनी म्हटलं. सन 2026-27 मध्ये सीबीएसई पॅटर्नची सर्वच शाळांमध्ये सुरुवात होईल, असेही शिक्षणमंत्र्यांनी यावेळेस बोलताना सांगितले. (CBSE Pattern)

सध्या अनेक विद्यार्थी आणि पालक यांचा CBSE बोर्डकडे कल वाढताना दिसत आहे. त्यासाठी सरकारी शाळा टिकवण्यासाठी सरकारकडून हा प्रयत्न केला जात असल्यचं बोलल जातंय.

राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे राष्ट्रगीतापाठोपाठ राज्यगीत होणं अनिवार्य असून मराठी भाषा प्रत्येक शाळात शिकवणं सक्तीचं असल्याचंही भुसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

अशाच सर्व क्षेत्रातील माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

हे पण पहा – Income Tax Recruitment 2025: आयकर विभागात नोकरीची मोठी संधी; लाखोंत मिळवा पगार!