करियरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्यांसाठी आनदांची बातमी आहे. भारतीय टपाल विभागामध्ये (Indian Post) एका मोठ्या भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदाच्या एकूण 25,200 पदांची भरती केली जाणार आहे. (India Post GDS Recruitment 2025) या भरतीची विशेषता म्हणजे यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारावर केली जाईल. भरती कधी होणार? आणि भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.
पदाचे नाव (India Post GDS Recruitment 2025) –
जाहिराती नुसार ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
उमेदवारांना 18 ते 40 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.
अर्ज पद्धती – ऑनलाईन (India Post GDS Recruitment 2025)
अर्ज शुल्क –
• सर्वसाधारण उमेदवार – रु. 100/-
• इतर उमेदवार – शुल्क नाही
अर्ज सुरू होण्याची तारीख – 03 मार्च 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 28 मार्च 2025
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.