करियरनामा ऑनलाईन। आयकर विभागा (Income Tax Recruitment 2025)अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ‘डेटा प्रोसेसिंग असिस्टंट’ ग्रेड ‘बी’ (Group B, Gazetted) या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.
पदाचे नाव –
जाहिराती नुसार ‘डेटा प्रोसेसिंग असिस्टंट’ ग्रेड ‘बी’ (Group B, Gazetted) या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या –
या पदासाठी एकूण 08 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.) (Income Tax Recruitment 2025)
वेतन –
पे मॅट्रिक्समध्ये वेतन स्तर 7, मासिक वेतन रुपये 44,900/- पासून ते रुपये 1,42,400/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन
पात्रता निकष –
• उमेदवारांनी एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून संगणक अनुप्रयोग किंवा
माहिती तंत्रज्ञान या विषयात बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
• प्रत्यक्ष प्रोग्रामिंगमधील अनुभवासह इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग कामाचा किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
• डेप्युटेशनद्वारे नियुक्तीसाठी अर्ज प्राप्त करण्याच्या अंतिम तारखेला उमेदवाराचे वय पंचावन्न वर्षांपेक्षा जास्त नसावे.
अर्ज कसा करावा –
• पात्र आणि योग्य उमेदवारांनी त्यांचा अर्ज निर्धारित फॉर्मेटमध्ये भरून पाठवावीत.
• अर्जासोबत मागील 5 वर्षांचे वार्षिक कार्यप्रदर्शन मूल्यांकन अहवाल (APARs), प्रमाणित केलेले, कॅडर मंजुरी, प्रामाणिकता प्रमाणपत्र, तपासणी प्रमाणपत्र, आणि गेल्या 10 वर्षांमध्ये लादलेले मुख्य/शिस्तीचे दंड यांचा तपशील मूळ प्रतीसह, सक्षम प्राधिकरणाने सही आणि शिक्कासह पाठवावा लागेल.
• पत्ता – “आयकर महासंचालनालय (सिस्टम्स)”, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, भुई मजला, E2, ARA सेंटर, झांडेवालन एक्सटेंशन, नवी दिल्ली – 110 055 अर्ज या पत्त्यावर पाठवावे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख –
जाहिरात प्रकाशित झालेल्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत अर्ज दाखल करायचा आहे.
निवड प्रक्रिया (Income Tax Recruitment 2025) –
उमेदवाराची पात्रता आणि अनुभव लक्षात घेऊन ही निवड प्रतिनियुक्तीच्या आधारावर केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी किंवा विभागाद्वारे आवश्यक वाटल्यास पुढील मूल्यांकनासाठी बोलावले जाऊ शकते.
महत्वाच्या लिंक्स –
• अधिक माहितीसाठी PDF पहा.
• अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.