करियरनामा ऑनलाईन। ज्या विद्यार्थ्यांची 10वी झालेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी ठरणार आहे. दक्षिण मध्य रेल्वे बोर्डाने नवीन मेगाभरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. (South Central Railway Recruitment 2025) या भरती अंतर्गत अपरेंटिस पदांसाठी एकूण 4232 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उमेदवारांची निवड पूर्णपणे मेरिटवर आधारित असेल आणि लेखी परीक्षा होणार नाही. मेरिट लिस्ट तयार केली जाईल, त्यानंतर डॉक्युमेंट्स तपासणी आणि वैद्यकीय तपासणी होईल. भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 ही दिलेली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.
पदाचे नाव –
जाहिरातीनुसार ‘अपरेंटिस’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.
या पदभरती अंतर्गत विविध व्यावसायिक क्षेत्रांसाठी (ट्रेड) रिक्त पदे भरली जाणार आहेत. ती क्षेत्र (ट्रेड) खालील प्रमाणे आहेत.
- एअर कंडिशनिंग
- डिझेल मेकॅनिक
- इलेक्ट्रीशियन
- इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
- फिट्टर
- पेंटर
- वेल्डर
पदसंख्या (South Central Railway Recruitment 2025) –
या पदासाठी 4232 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता –
उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डामधून 10 वी उत्तीर्ण केलेली असावी आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असावे.
वयोमर्यादा –
उमेदवारांसाठी 24 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.
अर्ज शुल्क –
- सामान्य, OBC, आणि EWS उमेदवारांसाठी – 100 रुपये
- SC, ST, आणि महिलांसाठी – शुल्क नाही
वेतन –
निवड झालेल्या उमेदवारांना महिन्याला 7,700 रुपये ते 20,200 रुपये पर्यंत स्टायपेंड मिळेल.
अर्ज पद्धती – ऑनलाईन (South Central Railway Recruitment 2025)
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- 10 वी मार्कशीट
- ITI डिप्लोमा
- पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज कसा करावा –
- सगळ्यात आधी www.scr.indianrailways.gov.in या वेबसाईटवर जा.
- ‘New Registration’ लिंकवर क्लिक करा.
- नोंदणी पूर्ण करा आणि कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
- अर्ज पूर्ण झाल्यावर फॉर्म प्रिंट करून ठेवा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जानेवारी 2025
अधिक माहितीसाठी PDF पहा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK करा.
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.