करियरनामा ऑनलाईन। GATE परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी महत्वाची अपडेट आलेली आहे. रुरकी आयआयटीकडून (Roorkee, IIT) ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग (GATE Admit Card Download 2025) या परीक्षेचे प्रवेशपत्र आज 7 जानेवारी 2025 रोजी जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या GATE च्या ऑफिशियल वेबसाइटला भेट देवून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. मागील दोन महिन्यांपासून या परीक्षेसाठी नोंदणीची मुभा देण्यात आली होती. त्याचबरोबर पुढील महिन्यातील 1 ते 16 फेब्रुवारी 2025 दरम्यान ही परीक्षा घेतली जाणार आहे.
परीक्षा कधी होणार? (GATE Admit Card Download 2025)
GATE च्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार परीक्षा पुढील महिन्यात 1, 2, 15 आणि 16 फेब्रुवारी 2025 तारखेस होणार आहे. त्याचबरोबर यावर्षी गेट ही परीक्षा दोन सत्रात पार पडणार आहे. पहिले सत्र सकाळी 9.30 वाजता सुरू होणार आहे. पहिल्या सत्राच्या दिलेल्या वेळेनुसार विद्यार्थ्यांनी काही वेळ आधी म्हणजे ठीक 8.00 वाजता परीक्षा गृहात उपस्थित असणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर दुसरे सत्र हे दुपारी ठीक 2.30 वाजता सुरू होईल आणि विद्यार्थ्यांनी ठीक 1. 00 वाजता परीक्षा गृहात उपस्थित राहावे. परीक्षा गृहात जाण्याआधी स्वतःच्या प्रवेशपत्राची प्रिंटआउट आपल्या जवळ आहे का हे चेक करून मगच परीक्षा गृहात जावे.
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा. –
स्टेप 1 – अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
स्टेप 2 – स्क्रीन वर प्रदर्शित झालेल्या सुचनेवर क्लिक करा.
स्टेप 3 – लॉगिन करण्यासाठी दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करा.
तुमचा नावनोंदणी आयडी आणि पासवर्ड टाका.
स्टेप 4 – तपशील सबमिट करा. संपूर्ण माहिती टाकल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा.
स्टेप 5 – प्रवेशपत्र डाउनलोड करा. एकदा प्रदर्शित झाल्यावर, प्रवेशपत्र तुमच्या डिव्हाइसवर डाउनलोड करा.
उमेदवारांनी त्यांच्या GATE प्रवेशपत्र 2025 वर खालील तपशीलांची पडताळणी करणे आवश्यक आहे :
- उमेदवाराचे नाव
- नावनोंदणी आयडी
- रोल नंबर
- परीक्षेची तारीख आणि वेळ
- परीक्षा केंद्राचे नाव आणि पत्ता
- छायाचित्र आणि स्वाक्षरी
- पेपर कोड
- अहवाल वेळ
- परीक्षेच्या दिवसाच्या सूचना
प्रवेशपत्रावरील माहितीत विसंगती आडळल्यास उमेदवारांनी विलंब न करता GATE परीक्षा प्राधिकरणांशी संपर्क साधावा. प्रवेशपत्रातील चूक दुरुस्त करण्यासाठी गेट परीक्षा आयोजित करणार्या संस्थेकडे प्रतीसह (ईमेलद्वारे) विभागीय गेट 2025 कार्यालयाशी संपर्क साधावा. ईमेलच्या विषयामध्ये ओळीत ‘अॅडमिट कार्ड करेक्शन’ असे लिहावे. उमेदवारांनी प्रवेशपत्रावर योग्य माहिती भरावी. ज्यामुळे त्यांना अचूक प्रवेशपत्र मिळू शकेल. (GATE Admit Card Download 2025)
इतर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी GATE च्या ऑफिशियल वेबसाइटला भेट दया.