Bank Of India Bharti 2024 | अनेक लोकांना बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण बँक ऑफ इंडिया अंतर्गत (Bank Of India Bharti 2024) एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत आता आर्थिक साक्षरता सल्लागार या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. उमेदवारांना हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्यामुळे तुम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज करायचे आहेत. त्याचप्रमाणे 4 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकर अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
पदाचे नाव | Bank Of India Bharti 2024
या भरती अंतर्गत आर्थिक साक्षरता सल्लागार या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
वयोमर्यादा
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 62 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
नोकरीचे ठिकाण
या भरती अंतर्गत तुमची निवड झाली, तर तुम्हाला नागपूर आणि गोंदिया या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
अर्ज पद्धती | Bank Of India Bharti 2024
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
अर्ज पाठविण्याचा पत्ता
नागपूर अंचल, चवथा माळा बैंक ऑफ इंडिया बिल्डींग, एस व्ही पटेल मार्ग पोस्ट बॉक्स क्र.4 नागपूर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
4 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
अर्ज कसा करावा?
- या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज पाठवायचा आहे.
- 4 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे आजच अर्ज करा.