7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!! महागाई भत्त्यात होणार ‘एवढी’ वाढ

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात (7th Pay Commission) मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी 2024 पासूनचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आला होता. यानुसार संबंधित नोकरदार वर्गाला 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एका वर्षात दोनदा सुधारित होत असतो. पहिल्यांदा जानेवारी महिन्यापासून आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यापासून महागाई भत्ता रिवाईज होत असतो.

जुलै महिन्यापासून DA किती वाढणार हे AICPI च्या जानेवारी ते जून या कालावधीमधील आकडेवारीनुसार स्पष्ट होणार आहे. पण, आतापर्यंत जानेवारी ते मे या कालावधीमधील AICPI ची आकडेवारी समोर आली आहे. अजून जून महिन्याची आकडेवारी समोर येणे बाकी आहे. यामुळे ही आकडेवारी कधी जाहीर होणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. आत्तापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार पुढील महागाई भत्ता वाढ किती टक्क्यांनी वाढणार याबाबत अंदाज वर्तवला जाऊ लागला आहे.

DA मध्ये किती वाढ होणार (7th Pay Commission)?
जानेवारीमध्ये AICPI इंडेक्सचा आकडा 138.9 वर होता. यात महागाई भत्ता वाढून 50.84 टक्के झाला. यानंतर फेब्रुवारीमध्ये इंडेक्स 139.2, मार्चमध्ये 138.9, एप्रिलमध्ये 139.4 आणि मेमध्ये 139.9 वर पोहचला आहे.
या पॅटर्ननुसार मे मध्ये महागाई भत्ता 52.91 इतका झाला आहे. विशेष म्हणजे जून महिन्याची आकडेवारी आल्यानंतर यामध्ये आणखी थोडीशी वाढ होणार आहे. मात्र असे असले तरी यावेळी महागाई भत्ता हा फक्त तीन टक्क्यांनी वाढणार अशी शक्यता आहे.

DA 4% होण्यासाठी….
DA 4% होण्यासाठी एआयसीपीआयचा इंडेक्स 143 पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. पण, सध्याची आकडेवारी पाहिली तर असे होणे अशक्य आहे. म्हणून जुलै महिन्यापासून (7th Pay Commission) महागाई भत्ता फक्त तीन टक्क्यांनी वाढणार असे बोलले जात आहे. खरेतर गेल्या दोन वर्षांच्या काळात सातत्याने महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढत राहिला आहे. पण जुलै महिन्यापासून महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढला तर दोन वर्षात पहिल्यांदाच महागाई भत्यामध्ये एवढी कमी वाढ होणार आहे.

कधी होणार निर्णय?
याबाबतचा निर्णय हा सप्टेंबर महिन्याच्या शेवटी किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतला जाईल अशी शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये निर्णय झाला तर त्याच महिन्याच्या पगारासोबत महागाई भत्ता वाढ आणि महागाई भत्ता फरकाची रक्कम सदर नोकरदार वर्गाला मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com