ICAI CA Exam 2024 : CA परीक्षेसाठी अर्ज नोंदणी सुरु; सप्टेंबरमध्ये होणार पेपर; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, फी विषयी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । ICAI म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ (ICAI CA Exam 2024) चार्टर्डकडून सप्टेंबर २०२४ मध्ये घेतल्या जाणाऱ्या सीए इंटर या परीक्षेच्या संदर्भात महत्वाची माहिती हाती आली आहे. सीए इंटर परीक्षा दि. 12 सप्टेंबर 2024 ते 23 सप्टेंबर 2024 दरम्यान घेतली जाईल. या परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी परीक्षेचा फॉर्म काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे. 7 जुलै 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून दि. 20 जुलै 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. जर विद्यार्थी सीए इंटरमिजिएट परीक्षेसाठी चा फॉर्म दि. 20 जुलै नंतर भरत असतील तर मात्र त्यांच्याकडून तो फॉर्म भरताना अधिक शुल्क आकारले जाईल.

हा फॉर्म भरण्यासाठीच्या महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे –
1. ७ जुलै २०२४- फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुरुवात
2. २० जुलै २०२४ – दंडात्मक शुल्क शिवाय फॉर्म भरण्याची शेवटची तारीख
3. २३ जुलै २०२४ – दंडात्मक शुल्क भरून फॉर्म भरण्याची शेवटची तारीख
4. २४ जुलै २०२४- फॉर्म मध्ये काही सुधारणा असल्यास त्यामध्ये बदल करता येतील
5. २६ जुलै २०२४- फॉर्ममध्ये बदल करण्यासाठीची शेवटची तारीख
6. जर विद्यार्थ्याने १ मे २०२४ आधी फाउंडेशन कोर्स मध्ये नोंदणी केली असेल तर तो सीए इंटरमिजिएट परीक्षा २०२४ देण्यासाठी पात्र धरला जाईल.

असा करा अर्ज (ICAI CA Exam 2024) –
जर तुम्ही सीए इंटरमिजिएट परीक्षा यावर्षी देत असाल तर तुम्ही या पॉईंट्स च्या मदतीने त्यासाठीचा फॉर्म भरू शकता.
1. सर्व प्रथम ICAI च्या www.eservices.icai.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
2. तिथे तुम्हाला तुमचे युजरनेम आणि पासवर्ड विचारला जाईल. हे भरून तुम्ही त्या संकेतस्थळावर लॉगिन करू शकता.
3. तिथे तुम्हाला सीए इंटर परीक्षेसाठी चा अर्ज दिसेल, तो अर्ज भरून झाल्यावर त्यासाठी आवश्यक असलेले शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल.
4. अर्ज भरून झाल्यावर त्यात विचारण्यात आलेली आवश्यक ती कागदपत्रे, तुमचा फोटो, आणि तुमची सही हे तिथे अपलोड करा
5. पुढे तुम्हाला हा फॉर्म सेव्ह करायचा आहे. पुढील गरजेच्या कामांसाठी तुम्ही हा फॉर्म तुमच्याकडे डाऊनलोड करून देखील ठेवू शकता

CA Inter परीक्षा फी –
सीए इंटरमिजिएट 2024 परीक्षा देण्यासाठी उमेदवारांना पुढे संगीतल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागेल –
युनिट १ मधील विद्यार्थ्यांसाठी
परीक्षा शुल्क – १५००/-
विलंब शुल्क – ६००/-
युनिट २ मधील विद्यार्थ्यांसाठी
परीक्षा शुल्क – २७००/-
विलंब शुल्क – ६००/-
नेपाळ, भूतान येथील विद्यार्थ्यांसाठी (ICAI CA Exam 2024) परीक्षा शुल्क वेगळे असेल परंतु विलंब शुल्क म्हणून रु. ६००/- आकारले जातील.
अबुधाबी, दोहा, दुबई इत्यादी देशांमधील विद्यार्थ्यांसाठी डॉलर्स मध्ये परीक्षा शुल्क आणि विलंब शुल्क भरावे लागेल. या संदर्भातील अधिक माहितीसाठी www.icai.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com