करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam 2024) कक्षातर्फे बीबीए, बीएमएस, बीसीए आणि बीबीएम या अभ्यासक्रमासाठी यावर्षी प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती मात्र या परीक्षेला जागांच्या तुलनेत केवळ 40 टक्केच उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले. उमेदवारांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन, सीईटी सेलच्या मागणीनुसार राज्य शासनाचे बीबीए/बीसीए/बीएमएस/बीबीएम या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अतिरिक्त सीईटी (Additional CET) आयोजित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार सीईटी सेलच्या www.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर दि. 29 जून ते 3 जुलै या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
सर्वोत्तम असणारे पर्सेंटाईल ग्राह्य धरण्यात येईल
ज्या उमेदवारांनी दि. 29 मे रोजी घेण्यात आलेली CET परीक्षा दिली आहे अशा इच्छुक उमेदवारांना देखील अतिरिक्त परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी दोन्ही परीक्षा दिल्या असतील तर त्यापैकी सर्वोत्तम असणारे पर्सेंटाईल प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना आपली सर्वोत्तम पर्सेंटाईलची गुणपत्रिका संगणकीय प्रणालीवर अपलोड करणे आवश्यक असणार आहे.
मागील महिन्यात दि. 29 मे रोजी पार पडलेल्या या परीक्षेला 48 हजार विद्यार्थी उपस्थित होते. राज्यात 1 लाख 8 हजार 741 एवढ्या जागा असताना केवळ 40 टक्के जागा भरल्या जातील (CET Exam 2024) एवढेच उमेदवार परीक्षेस उपस्थित होते. त्यामुळे उर्वरित 60 टक्के जागा रिक्त राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिवाय हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे अतिरिक्त CET परीक्षा घेण्यात येणार आहे.
बीबीए, बीएमएस, बीसीए या अभ्यासक्रमासाठी यंदा प्रवेश परीक्षा घेण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत कल्पना नसल्याने हे विद्यार्थी सीईटी परीक्षेपासून वंचित राहिले, असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही विद्यार्थ्यांना परीक्षा झाल्यानंतर या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटी बंधनकारक (CET Exam 2024) असल्याचे समजले. त्यामुळे 1, 8,741 जागा असताना दि. 29 मे रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेला केवळ 48 हजार 135 विद्यार्थी उपस्थित राहिले. उर्वरित जागा रिक्त राहण्याची भीती संस्था चालकांकडून व्यक्त करण्यात येत होती, या सर्व बाबींचा विचार करून या अतिरिक्त परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com