करिअरनामा ऑनलाईन । पुण्यामध्ये नोकरी करण्याची अनेक (PMC Recruitment 2024) तरुणांची इच्छा असते. शिक्षणाप्रमाणेच पुण्यात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. राज्याच्या ग्रामीण तसेच शहरी भागातून नोकरी मिळवण्यासाठी इथे असंख्य तरुण दाखल होत असतात. अशा तरुण उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदावर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज आवश्यक कागदपत्रासह खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2024 आहे. जाणून घ्या भरती विषयी सविस्तर…
संस्था – पुणे महानगरपालिका, पुणे
भरली जाणारी पदे –
1. समुपदेशक (PMC Recruitment 2024)
2. प्रयोगशाळा तंत्रज्ञ
पद संख्या – 12 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जून 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, १ ला मजला, ६६३, शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे ४११००२
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
भरतीचा तपशील – (PMC Recruitment 2024)
पद | पद संख्या |
समुपदेशक | 11 |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 01 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (PMC Recruitment 2024)
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
समुपदेशक | मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण व मास्टर ऑफ सोशल वर्कची (MSW) पदवी उत्तीर्णएच.आय.व्ही. एड्स विषयक समुपदेशनाचा किमान ३ वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक. |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | मान्यता प्राप्त विद्यापीठाची शास्त्र शाखेची पदवी (बी.एस. सी.) व डी. एम. एल. टी. उत्तीर्णएच.आय.व्ही. रक्तचाचणी कामाचा लॅबोरेटरमधील किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक. |
मिळणारे वेतन –
पद | मिळणारे वेतन |
समुपदेशक | रु. २२,३६५/- |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | रु. २२,३६५/- |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. इच्छुक उमेदवारांनी (PMC Recruitment 2024) अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे.
4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://pmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com