करिअरनामा ऑनलाईन । गणित विषय घेऊन 12 वी पास झालेल्या (IIT Seat Matrix 2024) बहुतेक विद्यार्थ्यांचे IITमध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न असते. आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई (JEE) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. JEE Advanced 2024 चा निकाल जाहीर झाल्यानंतर आता JoSAA समुपदेशन सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांना IIT मध्ये फक्त JoSAA समुपदेशनाद्वारे जागा वाटप केल्या जातात. JoSAA सीट मॅट्रिक्समध्ये IIT च्या जागा वाढवण्यात आल्या आहेत. देशातील 10 आयआयटीमध्ये जागा वाढल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
एकूण 355 जागा वाढल्या (IIT Seat Matrix 2024)
काही आयआयटीमध्ये जागा 50 तर काहींमध्ये 84 पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. JoSAA मॉक सीट वाटप निकाल दि. 17 जून 2024 रोजी प्रसिद्ध होईल. देशात एकूण 23 IIT महाविद्यालये आहेत. गेल्या वर्षी या 23 आयआयटीमधील जागांची संख्या 17,385 होती. मात्र या वर्षापासून आयआयटीमध्ये 355 जागा वाढवल्या आहेत. त्यानुसार 2024 मध्ये एकूण 17,740 जागांवर प्रवेश उपलब्ध होणार आहे.
कोणत्या IIT मध्ये किती जागा वाढल्या?
JoSAA Seat Matrix 2024 पाहिल्यास असे लक्षात (IIT Seat Matrix 2024) येते की प्रत्येक IIT मध्ये जागा वाढवण्यात आलेल्या नाहीत. 23 पैकी फक्त 10 IIT मध्ये जागांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्याची यादी इथे पाहू शकता
IIT महाविद्यालय | किती जागा वाढवल्या |
आईआईटी भुवनेश्वर | 20 |
आईआईटी बॉम्बे | 12 |
आईआईटी खड़गपुर | 30 |
आईआईटी जोधपुर | 50 |
आईआईटी गांधीनगर | 30 |
आईआईटी पटना | 84 |
आईआईटी गुवाहाटी | 10 |
आईआईटी भिलाई | 40 |
आईआईटी तिरुपति | 10 |
आईआईटी धारवाड | 75 |
देशातील 23 IIT महाविद्यालयांपैकी कोणत्या IIT मध्ये किती जागा आहेत ते पहा
भारतातील विविध राज्यांमध्ये एकूण 23 आयआयटी आहेत. या सर्वांमध्ये यंदा एकूण 17 हजार 740 जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. कोणत्या IIT मध्ये किती जागा (IIT Seat Matrix 2024) उपलब्ध आहेत त्याची यादी पहा
IIT महाविद्यालय | एकूण जागा |
आईआईटी भुवनेश्वर | 496 |
आईआईटी बॉम्बे | 1368 |
आईआईटी मद्रास | 520 |
आईआईटी दिल्ली | 1209 |
आईआईटी इंदौर | 480 |
आईआईटी खड़गपुर | 1899 |
आईआईटी हैदराबाद | 595 |
आईआईटी जोधपुर | 600 |
आईआईटी कानपुर | 1210 |
आईआईटी मद्रास | 1128 |
आईआईटी गांधीनगर | 400 |
आईआईटी पटना | 817 |
आईआईटी रुड़की | 1353 |
आईआईटी धनबाद (आईएसएम) | 1125 |
आईआईटी रोपर | 430 |
आईआईटी (बीएचयू) वाराणसी | 1589 |
आईआईटी गुवाहाटी | 962 |
आईआईटी भिलाई | 283 |
आईआईटी गोवा | 157 |
आईआईटी पलक्कड | 200 |
आईआईटी तिरुपति | 254 |
आईआईटी जम्मू | 280 |
आईआईटी धारवाड | 385 |
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com