करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या (HPCL Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अभियंता, अधिकारी आणि व्यवस्थापक पदांच्या एकूण 247 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे. जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर…
संस्था – हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
भरले जाणारे पद – अभियंता, अधिकारी आणि व्यवस्थापक
पद संख्या – 247 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2024
वय मर्यादा – 25 ते 45 वर्षे
भरतीचा तपशील – (HPCL Recruitment 2024)
Sl. No. | Posts Name | No. of Post |
1. | Mechanical Engineer | 93 |
2. | Electrical Engineer | 43 |
3. | Instrumentation Engineer | 05 |
4. | Civil Engineer | 10 |
5. | Chemical Engineer | 07 |
6. | Senior Officer – City Gas Distribution (CGD) O&M | 06 |
7. | Senior Officer – City Gas Distribution (CGD) Projects | 04 |
8. | Senior Officer/ Assistant Manager – Non-Fuel Business | 12 |
9. | Senior Manager – Non-Fuel Business | 02 |
10. | Manager Technical | 02 |
11. | Manager – Sales R&D Product Commercialisation | 02 |
12. | Deputy General Manager Catalyst Business Development | 01 |
13. | Chartered Accountants | 29 |
14. | Quality Control (QC) Officers | 09 |
15. | IS Officer | 15 |
16. | IS Security Officer – Cyber Security Specialist | 01 |
17. | Quality Control Officer | 06 |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंकवरून सादर करायचा आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या (HPCL Recruitment 2024) तारखेत आणि वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.
5. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.
7. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.hindustanpetroleum.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com