करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या (CBSE) इयत्ता दहावीच्या निकालांच्या पडताळणीसाठी यापूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना मूल्यांकन केलेल्या उत्तरपत्रिकांची छायाप्रत मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा लागणार आहे.
प्रत्येक उत्तरपत्रिकेसाठी 500 रुपये शुल्क भरावे लागणार
इयत्ता दहावीसाठी उमेदवार दि. २० ते २४ मे या कालावधीत ५०० रुपये भरून गुण पडताळणीसाठी अर्ज करू शकत होते. आता विद्यार्थ्यांना मूल्यांकन केलेल्या उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळू शकणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक उत्तरपत्रिकेसाठी ५०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
गुणांना आव्हान द्यायचे असल्यास हे करा….
उमेदवारांना ठराविक उत्तरासाठी दिलेल्या गुणांना आव्हान द्यायचे असल्यास, त्यांना पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा लागेल. उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी दि. ९ ते १० जून या कालावधीत अर्ज करता येणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रति प्रश्न १०० रुपये भरावे लागतील.
उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा (CBSE)
1. मूल्यांकन केलेल्या उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जा.
2. ‘परीक्षा’ विभागांतर्गत, ‘मूल्यांकन केलेल्या उत्तरपत्रिकांसाठी अर्ज करा’ वर क्लिक करा.
3. त्यानंतर, रोल नंबर, शाळा क्रमांक आणि केंद्र क्रमांक प्रविष्ट करा.
4. सूचनांचे अनुसरण करा आणि फॉर्म भरा. (CBSE)
5. त्यानंतर, ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा आणि अर्ज फी भरा.
6. परीक्षकाच्या ओळखीशी संबंधित सर्व माहिती ब्लॉक केल्यानंतर, विद्यार्थ्याला त्याच्या/तिच्या लॉगिन खात्यामध्ये उत्तरपत्रिकेची स्कॅन केलेली प्रत दिली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com