करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (DOT Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. दूर संचार मंत्रालयांतर्गत नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. दूरसंचार विभागामार्फत NCCS रिसर्च असोसिएट स्कीम अंतर्गत रिसर्च असोसिएट पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर…
संस्था – दूरसंचार विभाग, NCCS रिसर्च असोसिएट स्कीम अंतर्गत
भरले जाणारे पद – रिसर्च असोसिएट
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जून 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता – (DOT Recruitment 2024)
ADET (AC & HQ), रूम 301, नॅशनल सेंटर फॉर कम्युनिकेशन्स सिक्युरिटी, दुसरा मजला, सिटी टेलिफोन एक्सचेंज, संपंगीराम नगर, बंगलोर – 560027
वय मर्यादा –
1. पदवीधर उमेदवारांसाठी 28 वर्षे
2. पदव्युत्तर उमेदवारांसाठी 30 वर्षे
3. पीएचडी उमेदवारांसाठी 35 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या (DOT Recruitment 2024) उमेदवारांकडे इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/टेलिकॉम/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटरमध्ये प्रमुख) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून किमान 60% गुणांसह पदवी असणे आवश्यक आहे संबंधित विषयातील पदवी.
मिळणारे वेतन – रुपये 75,000/- दरमहा (अतिरिक्त लाभ आणि भत्ते)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – dot.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com