करिअरनामा ऑनलाईन । राज्य राखीव पोलीस बल मैदानी चाचणीला (SRPF Recruitment 2024) सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. राज्यातील ज्या जिल्ह्या अंतर्गत भरती प्रक्रिया पार पडत आहे, येथील जिल्हा क्रिडा अधिकाऱ्यांना मैदाने प्रमाणिक करण्याचे पत्र राज्य शासनाकडून पाठवण्यात आले आहे. राज्य राखीव पोलीस बल भरती प्रक्रिया २०२२-२३ करिता मैदानी चाचणी येत्या दि. ६ जून २०२४ पासून सुरू होत आहे. त्यामुळे या भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे त्यांनी कसून तयारी करणं गरजेचं आहे.
असं आहे भरती प्रक्रियेचं नियोजन
पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन (SRPF Recruitment 2024) गृह विभागाने केले आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पोलिस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे. अंदाजे ३० ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपविण्याचे नियोजन आहे. ऑक्टोबर महिनाअखेर या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होईल, अशी माहिती पत्राकाद्वारे देण्यात आली आहे.
राज्य राखीव पोलीस बल या घटकातील (SRPF Recruitment 2024) पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन २०२२-२३ ही येत्या ६ जून २०२४ रोजी सुरु होत आहे. त्या अनुषंगाने गटामध्ये सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमधील उमेदवारांच्या मैदानी चाचणी करिता ५ किमी धावणे, १०० मीटर धावणे व गोळा फेक यासाठी ४ मैदाने तयार करण्यात आली आहेत. ही मैदाने प्रमाणित करणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com