करिअरनामा ऑनलाईन । विधी म्हणजेच कायदा क्षेत्रात करिअर (CLAT Exam Date 2025) करण्याचा विचार करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजने कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट (Common Law Admission Test) म्हणजेच CLAT 2025 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. CNLU ने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार CLAT परीक्षा रविवार दि. 1 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे. अधिक माहितीसाठी consortiumofnlus.ac.in या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज (CLAT Exam Date 2025) –
CNLU ने दिलेल्या माहितीनुसार CLAT 2025 नोंदणी आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन पध्दतीने पूर्ण करायची आहे. ही प्रक्रिया जुलै 2024 मध्ये सुरू केली जाऊ शकते. CLAT अभ्यासक्रम, ऑनलाइन फॉर्म आणि समुपदेशन प्रक्रियेबद्दल तपशीलवार माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल. CLAT ही एक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आहे. ज्याद्वारे भारतातील सर्वोच्च कायदा महाविद्यालये आणि राष्ट्रीय कायदा विद्यापीठे (NLUs) मध्ये LLB, LLM यासह विविध UG आणि PG कायदा अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळू शकतो.
असं आहे परीक्षेचं स्वरूप –
CLAT परीक्षा 2 तासांची म्हणजेच 120 मिनिटांची असते. CLAT प्रश्नपत्रिकेत 5 विभाग असतात – कायदेशीर तर्क, तार्किक तर्क, इंग्रजी भाषा, चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान, परिमाणात्मक तंत्र. या (CLAT Exam Date 2025) परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग देखील लागू आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातात. त्याचप्रमाणे 2025 CLAT परीक्षेचा नमुना तपशील अधिसूचनेसह प्रसिध्द केला जाईल. परीक्षा आयोजन समितीने अद्याप CLAT 2025 साठी अधिकृत पोर्टल सक्रिय केलेले नाही. परंतु, उमेदवार कन्सोर्टियमच्या अधिकृत वेबसाइटवर नवीन अपडेट पाहू शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com