Interview Tips : मुलाखत देताना ‘या’ गोष्टी जरुर लक्षात ठेवा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । डिजिटल जमान्यात तुम्हाला नोकरीसाठी (Interview Tips) मुलाखत ऑनलाईन द्यायची असो किंवा ऑफलाईन, तुम्हाला यासाठी आधीपासून जोरदार तयारी करायला हवी. जर तुम्हीही नोकरी शोधताय आणि मुलाखतीची तयारी करत आहात तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आज आपण जाणून घेवूया नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स…

1. CVध्ये संपूर्ण माहिती देणे महत्त्वाचे आहे
मुलाखत देण्यापूर्वी तुम्ही तुमच्या सीव्हीमध्ये (Curriculum Vitae) चुका करु नका. CV मध्ये अशी माहिती लिहू नका ज्यामुळे तुमची मुलाखतीत निवड होऊ शकत नाही. म्हणून तुमच्या बायोडाटामध्ये नेहमी स्वतःविषयी योग्य माहिती लिहा.

2. तुमच्या CV ची एक प्रत तुमच्याकडे ठेवा
जर तुम्ही ऑनलाईन मुलाखत देत असाल तर तुम्ही मुलाखतीदरम्यान क्षणभरही स्क्रीन सोडू शकत नाही. मुलाखत घेणारा व्यक्ती सहसा उमेदवाराच्या CVमधून प्रश्न विचारतो, म्हणून तुम्ही स्वतः जवळ CV ची एक प्रत ठेवायलाच हवी.

3. स्वतःवर ठेवा पूर्ण विश्वास (Interview Tips)
तुम्ही नेहमी तुमच्याबद्दल एक छोटा आणि स्पष्ट परिचय द्या आणि HRने तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आत्मविश्वासाने द्या. मुलाखत देताना अजिबात घाबरू नका. कमी शब्दात पूर्ण उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मुलाखत पॅनेल नेहमीच तुमच्या आत्मविश्वासाचे काळजीपूर्वक मूल्यांकन करते.

4. अशी द्या प्रत्यक्ष मुलाखत
जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जाता तेव्हा मुलाखतीच्या खोलीत प्रवेश करताना तुमच्यात आत्मविश्वास भरलेला असला पाहिजे. घाबरून न जाता तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की (Interview Tips) मुलाखत घेणारी व्यक्ती देखील तुमच्यापैकीच एक आहे, फक्त तुमच्या ज्ञानाची पातळी त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि तुम्हाला तुमची ज्ञानाची पातळी वापरून पॅनेल वरील व्यक्तीला प्रभावित करायचे आहे.

5. ऑनलाइन मुलाखत देताना योग्य जागा निवडा
ऑनलाइन मुलाखतीला उपस्थित राहताना योग्य ठिकाण निवडणे हा घटक सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. यासाठी तुम्ही शांत वातावरण निवडणे महत्वाचे आहे. व्हिडिओ कॉल सुरू असताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येता कामा नये. व्हिडिओ कॉलसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी अधिक चांगली असावी. उत्तम प्रकाशासह व्यावसायिकदृष्ट्या योग्य खोली निवडा.

6. प्रश्न आणि उत्तरांची पूर्व तयारी करा
ऑनलाइन मुलाखतीची तयारी काही दिवस आधीपासून सुरू करा. वेगवेगळ्या प्रश्नांची तयारी करा, पण उत्तरांमध्ये गोंधळ घालू नका. तुम्ही स्वत:ला कुठे पाहता? तुमचे छंद काय आहेत? आम्ही (Interview Tips) तुम्हाला का नियुक्त करावे? किंवा तुम्ही अर्ज केलेल्या भूमिकेशी संबंधित प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार रहा.

7. या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका (Interview Tips)
मुलाखत ऑनलाईन असो की ऑफलाईन.. मुलाखत देताना औपचारिक कपडे परिधान करा, तुमच्या देहबोलीवर लक्ष ठेवा आणि मुलाखतीदरम्यान समोरच्या व्यक्तीशी आय कॉनटॅक्ट चांगला ठेवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com