करिअरनामा ऑनलाईन । राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell 2024) एक परिपत्रक प्रसिद्ध करुन महत्वाची माहिती दिली आहे. व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी (MBA), संगणक उपयोजन पदव्युत्तर पदवी (MCA) या एकात्मिक अभ्यासक्रमांचे प्रवेशही समाईक प्रवेश परीक्षेद्वारे (CET) होणार आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सीईटी देणे बंधनकारक असणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत 18 एप्रिल 2024 आहे.
राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५साठी बीबीए, बीसीए, बीएमएम, बीबीएम या अभ्यासक्रमाचे प्रवेश सीईटीद्वारे घेतले जाणार आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) हे अभ्यासक्रम आपल्या अखत्यारित (CET Cell 2024) घेतल्याने या अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा मिळाला आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांची आतापर्यंत महाविद्यालय स्तरावर होणारी प्रवेश प्रक्रिया सीईटीच्या माध्यमातून राज्य स्तरावर केंद्रीय पद्धतीने होणार आहे. त्याशिवाय २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी एमबीए एकात्मिक आणि एमसीए एकात्मिक अभ्यासक्रमांनाही महा-बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी या परीक्षेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
अर्ज करण्यापूर्वी हे वाचा (CET Cell 2024)
एमबीए एकात्मिक आणि एमसीए एकात्मिक अभ्यासक्रमासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी सीईटीबाबतची माहिती घेऊन त्यासाठीची ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया करावी. बीबीए, बीसीए, बीबीएम सीईटीसाठी संकेतस्थळावर जाहीर केलेला अभ्यासक्रम आणि माहिती पुस्तक (CET Cell 2024) एमबीए एकात्मिक आणि एमसीए एकात्मिक या अभ्यासक्रमांसाठीही लागू असल्याचे राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाने स्पष्ट केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com