National Credit Framework : शाळांमध्ये लागू होणार ‘क्रेडिट सिस्टीम’; अकॅडमी बँकेत जमा होणार विद्यार्थ्यांचं क्रेडिट

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मुलांच्या सर्वांगीण विकासाचा आणि (National Credit Framework) त्यांच्या गरजेचा विचार करून शिक्षणात नवनवीन बदल होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क (National Credit Framework) या अंतर्गत देखील विविध प्रयोग राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी महत्त्वाची पावले देखील उचलली जात आहेत. या धोरणानुसार आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शाळांसाठी आणखी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शाळांच्या नियमांमध्ये एक बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा बदल शैक्षणिक वर्ष 2024 -25 पासून लागू करण्यात येणार आहे. शाळेमध्ये आता क्रेडिट सिस्टम प्रणाली (National Credit Framework) लागू होणार आहे. हा प्रोजेक्ट शाळेमध्ये ‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून राबवला जाणार आहे.

काय आहे क्रेडिट सिस्टीम? (National Credit Framework)
ही क्रेडिट सिस्टीम इयत्ता 6 वी, 9 वी आणि 11 वीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. या प्रणालीमध्ये नवनवीन वर्षांत 210 तास प्रत्येक विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यास 40 ते 50 क्रेडिट गुण दिले जाणार आहेत. परंतु यासाठी दोन अटी देखील ठेवलेल्या आहेत. पहिली अट म्हणजे सर्व विषयात परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि दुसरी अट म्हणजे वर्षभरात वर्गात 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याने जर 5 विषय घेतले असते, तर 210 प्रति विषयाप्रमाणे 1050 तास अभ्यासाचे होतात. तसेच यामध्ये 150 तास अंतर्गत मूल्यांकन, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव आणि सामान्य अभ्यासासाठी असणार आहेत. प्रत्येक विषयासाठी सात क्रेडिट असणार आहेत. म्हणजेच सक्तीचे असणारे पाच विषय घेतले, तर त्याला 40 क्रेडिट मिळेल जर एखाद्या विद्यार्थ्याने सहा किंवा सात विषय घेतले, तर त्याला 47 ते 54 पर्यंत क्रेडिट मिळणार आहे.

अकरावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील हे क्रेडिट मिळणार आहे. अकरावीमध्ये एक भाषा आणि चार विषय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 40 क्रेडिट दिले जाणार आहेत. अकरावीमध्ये (National Credit Framework) अंतर्गत मूल्यमापन, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव आणि सामान्य अभ्यासासाठी दीड तास वेळ असणार आहे. विद्यार्थ्यांनी हे विषय घेतल्यास त्यांना 47 ते 54 एवढे क्रेडिट मिळणार आहे.

अकॅडमी बँकेत जमा होणार हे क्रेडिट
विद्यार्थ्यांना मिळणारे क्रेडिट हे अकॅडमी बँक ऑफ क्रेडिटमध्ये जमा होणार आहे. सीबीएसई (CBSE) बोर्डाने प्रत्येक शाळेला या प्रणालीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या प्रोजेक्टमध्ये सहभागी होणाऱ्या शाळांना बोर्डाकडून मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com