करिअरनामा ऑनलाईन । भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई अंतर्गत (IIT Bombay Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक सुरक्षा अधिकारी, विशेष कर्तव्य अधिकारी (एमईपी), विशेष कर्तव्य अधिकारी (सिव्हिल) पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
ज्यांना मुंबईमध्ये नोकरी करायची आहे अशा उमेदवारांसाठी ही भरती महत्वाची ठरू शकते. पात्र झाल्यास या माध्यमातून तुम्हाला प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेत नोकरीची मोठी संधी मिळू शकते. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे. जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर….
संस्था – भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई
भरली जाणारी पदे – (IIT Bombay Recruitment 2024)
1. सहाय्यक सुरक्षा अधिकारी
2. विशेष कर्तव्य अधिकारी (एमईपी)
3. विशेष कर्तव्य अधिकारी (सिव्हिल)
पद संख्या – 06 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
भरतीचा तपशील –
पद | पद संख्या |
सहाय्यक सुरक्षा अधिकारी | 04 |
विशेष कर्तव्य अधिकारी (एमईपी) | 01 |
विशेष कर्तव्य अधिकारी (सिव्हिल) | 01 |
मिळणारे वेतन – (IIT Bombay Recruitment 2024)
पद | पगार |
सहाय्यक सुरक्षा अधिकारी | Pay Level 6 (35400-112400) |
विशेष कर्तव्य अधिकारी (एमईपी) | Pay Level E05 (144200-218200) |
विशेष कर्तव्य अधिकारी (सिव्हिल) | Pay Level E05 (144200-218200) |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्यासाठी खाली (IIT Bombay Recruitment 2024) दिलेल्या लिंकचा वापर करा.
4. अर्जामध्ये आवश्यक माहिती द्या; अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
PDF 3
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.iitb.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com