SBI Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त पदे (SBI Recruitment 2024) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रमुख–कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंग पद भरले जाणार आहे. या पदावर काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने अर्ज कसा आणि कुठे करावा, यासाठी शेवटची तारीख कोणती आहे; तसेच पात्रता निकष काय आहेत याविषयी जाणून घेवूया…

बँक – स्टेट बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – प्रमुख – कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंग
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ एप्रिल २०२४
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
१. शासनमान्य विद्यापीठातून / AICTE/ UGC सरकार मान्य पदवी असणे अवश्यक आहे.
२. कोणत्याही क्षेत्रात मॅनेजमेंट पदवी असणाऱ्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
३. MBA – मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन पदवी/ PGDBM – बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा/ PGDM – मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा – अशा प्रकारचे शिक्षण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य दिले जाईल.

अर्ज फी – (SBI Recruitment 2024)
१. जे उमेदवार सामान्य/EWS वर्गातून अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी अर्ज शुल्क – ७५०/- रुपये आहे
२. SC/ ST/ OBC/ PwBD वर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
वय मर्यादा – ५५ वर्षे

असा करा अर्ज –
१. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
२. ऑनलाइन अर्ज करताना उमेदवाराने आपली सही आणि फोटो अपलोड करणे गरजेचे आहे.
३. उमेदवाराने अर्जासोबत सर्व आवश्यक (SBI Recruitment 2024) असणारी कागदपत्रे जोडावी.
४. अर्जात दिलेली माहिती अचूक असावी.
५. इच्छुक उमेदवारांनी नोकरीचा अर्ज अंतिम तारखेआधी भरणे गरजेचे आहे.
६. अर्जाची अंतिम तारीख ही ९ एप्रिल २०२४ आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com