करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी संदर्भात एक (SAMEER Recruitment 2024) महत्वाची अपडेट आहे. सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च म्हणजेच SAMEER येथे विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी E-Mail/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
संस्था – सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. सल्लागार (प्रशासन/खाते/खरेदी) – 03 पदे
आवश्यक पात्रता – कार्मिक आणि प्रशासन, खरेदी, खाती आणि आर्थिक बाबींचा अनुभव. सरकारी/स्वायत्त संस्थांमधून प्रशासन/लेखा अधिकारी किंवा समकक्ष किंवा त्याहून अधिक पदावर निवृत्त झालेले असावे.
2. सल्लागार (तांत्रिक) – 01 पद
आवश्यक पात्रता – इलेक्ट्रिकल, एअर कंडिशनिंग आणि सिव्हिलशी संबंधित तांत्रिक बाबी हाताळण्याचा अनुभव, वेतन स्तर 07 किंवा त्यावरील अनुभवासह सेवेतून निवृत्त झालेले असावे.
पद संख्या – 04 पदे
अर्ज करण्याची पद्धत – E-Mail /ऑफलाईन (SAMEER Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Registrar, Society for Applied Microwave Electronics Engineering & Research, IIT Campus, Hill Side, Powal, Mumbai – 400076
अर्ज करण्यासाठी E-Mail ID – [email protected]
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2024 रोजी, 64 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई , चेन्नई, कोलकाता.
काही महत्वाच्या लिंक्स – (SAMEER Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.sameer.gov.in.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com