IGI Aviation Recruitment 2024 : 12 वी पास उमेदवारांसाठी मोठी बातमी!! IGI एव्हिएशनकडून 1074 जागांवर मेगाभरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । IGI एव्हिएशन सर्व्हिसेस (IGI Aviation Recruitment 2024) प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ग्राहक सेवा एजंट पदाच्या तब्बल १०७४ रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तुमच्यासाठी सरकारी नोकरीची ही उत्तम संधी आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज भरायचा आहे.

१०+२ म्हणजेच १२ वी पास उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकणार आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असुम अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे २०२४ आहे. या (IGI Aviation Recruitment 2024) पदासाठी पात्र उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा तसेच अर्ज कसा करायचा, निवड प्रक्रिया कशी असेल याबाबत सविस्तर जाणून घेवूया….

संस्था – IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड
भरले जाणारे पद – ग्राहक सेवा एजंट
पद संख्या – १०७४ पदे (IGI Aviation Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मे 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – पात्र उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डकडून १०+२ (१२ वी) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असावे.
मिळणारे वेतन – निवड झालेल्या उमेदवासास १५ हजार ते २५ हजार पगार दिला जाईल
अशी असेल निवड प्रक्रिया –
१. ग्राहक सेवा एजंट पदासाठी उमेदवारास सुरुवातीला लेखी परिक्षेला बसावे लागेल.
२. त्यानंतर लेखी परिक्षा पास झालेल्या उमेदवारांना दिल्ली येथे मुलाखतीला जावे लागेल.
३. लेखी परिक्षा आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवाराची निवड केली जाईल.
४. त्यानंतर वैद्यकीय तापसणी आणि वर्णपूर्व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारास या पदासाठी निवडले जाईल.

असा करा अर्ज – (IGI Aviation Recruitment 2024)
१. ग्राहक सेवा एजंट पदासाठी उमेदवारांनी https://igiaviationdelhi.com/igi-avaiation-job-application-important-instructions/ या अधिकृत लिंकवर क्लिक करुन अर्ज करायचा आहे.
२. अर्ज भरण्यापूर्वी https://igiaviationdelhi.com/wp-content/uploads/2024/03/IGI-English-Adv-2024.pdf या लिंकवर जावे आणि अधिसुचना नीट वाचावी आणि त्यानंतर अर्ज भरायचा आहे.
३. उमेदवाराने चुकीची माहिती आणि शेवटच्या तारखेनंतर अर्ज भरल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://igiaviationdelhi.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com