IPPB Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी!! लगेच करा APPLY

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी बँकेत नोकरी करण्याची अनेक तरुणांची (IPPB Recruitment 2024) इच्छा असते. अशा उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने भरती जाहीर केली आहे. एकूण 47 पदांसाठी ही भरती जाहीर झाली आहे. नोकरीच्या शोधात असणारे उमेदवार या संधीचा फायदा घेवू शकतात.

या भरतीसाठी बँकेने अधिकृत नोटिफिकेशन जारी केले असून अर्जाची प्रक्रिया सुरु केली आहे. इच्छुक उमेदवार 15 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करु शकतात. उमेदवार IPPB च्या अधिकृत वेबसाइटला ippbonline.com भेट देऊ ऑनलाइन अर्ज भरू शकता. पण रिक्त पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.

संस्था – इंडिया पोस्ट पेमेंट बँक
पद संख्या – 47 पदे
आरक्षण – (IPPB Recruitment 2024)
-इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ४७ रिक्त पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.
-यापैकी २१ पदे अनारक्षित प्रवर्गासाठी, ४ रिक्त पदे EWS प्रवर्गासाठी, १२ रिक्त पदे ओबीसी प्रवर्गासाठी आणि ७ सीएस आणि ३ एसटी प्रवर्गासाठी आहेत.

वय मर्यादा
उमेदवारांचे वय 21 ते 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
अर्ज फी – 700 रुपये
एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 150 रुपये
अशी असेल निवड प्रक्रिया –
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड पदवी गुण, गट चर्चा किंवा मुलाखतीद्वारे केली जाईल.

असा करा अर्ज –
1. IPPB भरतीसाठी अधिकृत वेबसाइट ippbonline.com ला भेट द्या.
2. होम पेजवर दिसणाऱ्या करिअर ऑप्शनवर क्लिक करा
3. आता स्वत:च्या नावाची नोंदणी करा आणि अर्ज भरा.
4. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
5. अर्ज फी जमा करा. (IPPB Recruitment 2024)
6. अर्ज सबमिट करा आणि पुढील वापरासाठी अर्जाची प्रिंट घ्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com