करिअरनामा ऑनलाईन । नोकर भरतीच्या वेगवेगळ्या संधीविषयी (Ordnance Factory Recruitment 2024) आपण नेहीमी पाहत असतो. त्याचप्रमाणे एका नवीन भरतीविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. आयुध निर्माणी, भंडारा येथे भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) पदाच्या 80 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2024 आहे.
संस्था – आयुध निर्माणी, भंडारा
भरले जाणारे पद – DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर)
पद संख्या – 80 पदे (Ordnance Factory Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Chief General Manager, Ordnance Factory Bhandara District: Bhandara Maharashtra, Pin-441906.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Ordnance Factory Recruitment 2024)
ज्या उमेदवारांनी AOCP ट्रेडच्या NCTVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र असलेले AOCP ट्रेडमध्ये शिकाऊ प्रशिक्षण पूर्ण केले आहे; जे पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या अंतर्गत किंवा मुनिशन इंडिया लिमिटेड (MIL) अंतर्गत आयुध कारखान्यांमध्ये प्रशिक्षित आहेत, त्यांना प्रशिक्षण/अनुभव आहे. लष्करी दारूगोळा आणि स्फोटकांची निर्मिती आणि हाताळणी करणारे उमेदवार पात्र असतील.
वय मर्यादा –
30 मार्च 2024 रोजी 18 वर्षे ते 35 वर्षापर्यंत
SC/ST – 05 वर्षे सूट
OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी – फी नाही (Ordnance Factory Recruitment 2024)
मिळणारे वेतन – 19,900/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – भंडारा (महाराष्ट्र)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.ofbindia.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com