SSC CPO Recruitment 2024 : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत तब्बल 4187 पदांवर भरती जाहीर; 1,12,400 एवढा पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग अंतर्गत विविध (SSC CPO Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून दिल्ली पोलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तब्बल 4187 पदासाठी ही भरती असणार आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे.

देशातील तरुण नेहमीच सरकारी नोकर भरतीच्या प्रतीक्षेत असतात. अशातच कर्मचारी निवड आयोगाने जाहीर केलेली ही भरती पर्वणीच समजावी लागेल. पदवीधारक उमेदवार या भरती प्रक्रियेत सहभागी होवू शकतात. त्यामुळे ज्यांना सरकारी नोकरी मिळवायची आहे; अशा उमेदवारांनी विलंब न करता अर्ज करायचा आहे. सविस्तर जाणून घेवूया रिक्त पदे, अर्ज फी, पात्रता आणि वेतनाविषयी….

संस्था – कर्मचारी निवड आयोग (SSC CPO Recruitment 2024)
भरले जाणारे पद – दिल्ली पोलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक
पद संख्या – 4187 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च 2024
वय मर्यादा – 20 ते 25 वर्षे

अर्ज फी –
General and Other Backward Class: RS.100/-
Women, SC/ST, and Ex-Servicemen: Nil
अशी आहे निवड प्रक्रिया –
पेपर-1
पीईटी/पीएसटी
पेपर-2

भरतीचा तपशील – (SSC CPO Recruitment 2024)

पदपद संख्या 
दिल्ली पोलिस186
केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक4001

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदशैक्षणिक पात्रता
दिल्ली पोलिसBachelor’s degree from a recognized university or equivalent
केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षकBachelor’s degree from a recognized university or equivalent.

मिळणारे वेतन –
1. दिल्ली पोलिस – Level-6 (Rs.35,400-Rs.1,12,400/-)
2. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक – Level-6 (Rs.35,400-Rs.1,12,400/-)
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी (SSC CPO Recruitment 2024) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी दिलेल्या तारखे अगोदर अर्ज करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (SSC CPO Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com