NATA Exam 2024 : आर्किटेक्चर होणाऱ्यांसाठी NATA 2024 परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरू; ‘या’ तारखेला परीक्षा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आर्किटेक्चर होवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (NATA Exam 2024) महत्वाची अपडेट आहे. नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर परीक्षा (NATA) 2024 साठी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर ने नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या परीक्षेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार www.nata.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

या तारखेला होणार परीक्षा
NATA परीक्षा एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीत सर्व शनिवार (NATA Exam 2024) आणि रविवारी दोन सत्रात घेतली जाईल. या NATA परीक्षेचे गुण 2 शैक्षणिक वर्षांच्या कालावधीसाठी वैध असतील. NATA 2024 ची परीक्षा येत्या दि. 6 एप्रिल रोजी होणार आहे. ही परीक्षा दोन सत्रात घेतली जाणार आहे. पहिले सत्र सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत असेल, तर दुसरे सत्र दुपारी 1.30 ते 4.30 या वेळेत होणार आहे.

असा करा अर्ज (NATA Exam 2024)
या परीक्षेसाठी अर्ज करताना, उमेदवारांना त्यांचे तपशील आणि शैक्षणिक पात्रता प्रविष्ट करावी लागेल. या व्यतिरिक्त उमेदवारांना त्यांचे नवीन फोटो अपलोड करावे लागतील. उमेदवाराचा फोटो आणि स्वाक्षरी jpg/jpeg मध्ये असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com