10 th Board Exam 2024 : मुलांनो… परीक्षेचे टेन्शन घेवू नका; 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन नंबर; इथे फोन करून तणाव करा दूर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च (10 th Board Exam 2024) माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी 10 वी ची परीक्षा आजपासून (ता.1 मार्च) सुरु झाली आहे. राज्यभरातून सुमारे 16 लाख विद्यार्थी या परीक्षेस बसले आहेत. मराठी विषयाच्या पेपरने या परीक्षेला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी 10 वी ची परीक्षा म्हणजे आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे. विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा १० ते २९ तारखेदरम्यान घेण्यात आल्या होत्या तर लेखी परीक्षा १ मार्च ते २६ मार्च दरम्यान होणार आहेत.

समुपदेशनासाठी विभागनिहाय क्रमांक (10 th Board Exam 2024)
परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण असतो. त्यामुळे यादरम्यान विद्यार्थ्याला नैराश्‍य येण्याची शक्यता असते. याचा उत्तर लेखनावर परिणाम होवू शकतो. त्यासाठी बोर्डाच्या वतीने विभागनिहाय समुपदेशन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासाठी हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आले आहेत. यामध्ये उपलब्ध असलेल्या समुपदेशकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकेचे निरसन केले जाईल. नागपुरात विद्यार्थी ९८२२६९२१०३, ८८३०४५८१०९, ९६७३१६३५२१, ८३०८००७६१३ या क्रमांकावर संपर्क करू शकतात. अधिक माहितीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी शिक्षण मंडळाच्या https://mahahsscboard.in/ या वेबसाईटला भेट द्यायची आहे.

प्रत्येक जिल्ह्यात पाच भरारी पथके तैनात
परीक्षेमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाने विविध उपाययोजना केल्या आहेत. यंदा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पाच भरारी पथके ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्राथमिक (10 th Board Exam 2024) शिक्षण, माध्यमिक शिक्षण, राज्य शिक्षण व प्रशिक्षण, योजना आणि उपशिक्षणाधिकारी यांच्या भरारी पथकांचा समावेश राहणार आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील महसूल विभागाचे भरारी पथकही परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com