करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन आणि विकास (DRDO Recruitment 2024) संस्था म्हणजेच DRDO ने विविध पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार, ट्रेड (ITI) शिकाऊ पदांच्या एकूण 90 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च 2024 आहे.
या भरतीमुळे सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची एक चांगली संधी निर्माण झाली आहे. पदवीधर, डिप्लोमाधारक तसेच ITI शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी विलंब न करता या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. या भरतीविषयी सविस्तर माहिती जाणून घेवूया..
संस्था – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO
भरले जाणारे पद – (DRDO Recruitment 2024)
1) पदवीधर प्रशिक्षणार्थी – 15 पदे
2) तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार – 10 पदे
3) ट्रेड (ITI) शिकाऊ – 65 पदे
पद संख्या – 90 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 मार्च 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता – Advanced Systems Laboratory (ASL) कांचनबाग, PO, हैदराबाद-500058
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. पदवीधर शिकाऊ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील पदवी असणे आवश्यक आहे.
2. तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ पदांसाठी अर्ज (DRDO Recruitment 2024) करणाऱ्यांकडे संबंधित विषयात डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
3. ट्रेड (ITI) शिकाऊ उमेदवारांसाठी संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन –
1. पदवीधर प्रशिक्षणार्थी – रु. 9000/- दरमहा
2. तंत्रज्ञ शिकाऊ – रु 8000/- दरमहा
3. ट्रेड अप्रेंटिस – रु 7000/- दरमहा
काही महत्वाच्या लिंक्स – (DRDO Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com