करिअरनामा ऑनलाईन । 12 वी ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (HSC Exam 2024) महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉल तिकीट सोमवार दि. 22 जानेवारीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे; अशी माहिती मंडळाने दिली आहे. विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत हे प्रवेशपत्र मिळणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
हॉल तिकीटची प्रिंट मिळणार
फेब्रुवारी-मार्च २०२४ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी बारावीच्या परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून (HSC Exam 2024) विद्यार्थ्यांना द्यावेत, अशी सूचना राज्य मंडळाने केली आहे. प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांनी, प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी; अशा स्पष्ट सूचना मंडळाने दिल्या आहेत.
हॉल तिकीट गहाळ झाल्यास पुन्हा मिळणार (HSC Exam 2024)
प्रवेशपत्रात विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात. विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र गहाळ झाल्यास संबंधित महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र द्यावे; अशा सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केल्या आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com