करिअरनामा ऑनलाईन । शाळेची फी न भरल्यामुळे (Big News) विद्यार्थ्यांना चालू परीक्षेदरम्यान वर्गा बाहेर काढण्यात आल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ठाण्यातील वर्तक नगर भागात असलेल्या लिटल फ्लावर नावाच्या शाळेत घडला. दरम्यान या प्रकारानंतर पालक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
ठाणे शहरातील वर्तकनगर भागात लीटल फ्लावर ही शाळा आहे. या शाळेतील काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेची फी भरली नाही म्हणून परीक्षा देत असलेल्या विद्यार्थांना वर्गाबाहेर काढण्यात आलं. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांचे पालकांनी ठिय्या मांडत शाळेचा निषेध नोंदवला.
शाळा व्यवस्थापनाच्या चुकीमुळे आगाऊ फी भरून देखील काही विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नसल्याने देखील पालक वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांचे (Big News) पालक आक्रमक झाल्याने घटनास्थळी पोलिस दाखल झाले. पोलिसांकडून पालकांना शांत राहण्याचे आव्हान करत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com