करिअरनामा ऑनलाईन । शैक्षणिक विभागाने विद्यार्थी हिताचे (Education) काही निर्णय घेतले आहेत. या धर्तीवर काही महत्त्वपूर्ण बदल घडवण्यात आले असून आता केंद्राकडून ठराविक विद्यार्थ्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. याबाबत देशातील अनेक विद्यापीठं आणि उच्च शिक्षण संस्थांना कळवलं जात आहे. यामुळे रिसर्च इंटर्नशिप संदर्भातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
पदवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार स्टायपेंड
रिसर्च इंटर्नशिपचा थेट फायदा आता विद्यार्थ्यांना मिळणार असून, जे विद्यार्थी पदवी शिक्षण घेत आहेत आणि विविध संस्थांमध्ये इंटर्नशिप करत आहेत त्यांना निर्धारित रक्कम स्टायपेंड स्वरुपात दिली जाणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी विम्याचीही तरतूद केली जाणार आहे.
UGC च्या वतीनं वरील तरतुदींसाठीच्या मसुद्यावर गुंतवणूकदारांकडून त्यांची मतं मागवण्यात आली त्यानंतर यासंदर्भातील निर्णय घेण्यात आले. रिसर्च इंटर्नशिप निर्धारित करण्यासाठी सदरील शिक्षण संस्थांच्या माध्यमातून स्थानिक बाजारपेठांच्या गरजा लक्षात घेत एक सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. ज्या आधारे इंटर्नशिप प्रोग्रामही आखले जाणार आहेत. युजीसीच्या मते विद्यापीठ स्तरावर जॉईंट रिसर्च प्रोजेक्टलाही दुजोरा मिळणं अपेक्षित असून, विद्यार्थ्यांसाठी करिअर काऊंन्सेलिंग सेल असणंही अपेक्षित आहे.
युजीसीच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार रिसर्च इंटर्नशिपसाठी उच्च शिक्षण संस्थामध्ये एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागणार आहे. या संस्थांकडून रिसर्च इंटर्नशिपसाठी विविध कंपन्यांसमवेत करार केले जाणार आहेत. 4 वर्षीय पदवी शिक्षण कार्यक्रमादरम्यान चौथ्या वर्षासाठी रिसर्चची व्यवस्था असून, उच्च शिक्षण संस्थांकडून प्रत्येक पात्र विद्यार्थ्यासाठी इंटर्नशिप सुपरवायर नेमण्यात येणार आहे. त्यांच्याकडून निर्धारित वेळेत इंटर्नशिप पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत होणार आहे.
विद्यार्थ्यांना असा होणार फायदा (Education)
युजीसीच्या (UGC) मते पदवी शिक्षणादरम्यान इंटर्नशिप केल्यामुळं विद्यार्थ्यांना नव्या शिक्षण आयोगानुसार अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये समाधानकारक गुण मिळवता येतील. शिवाय संबंधिक कंपनीच्या शिफारसीनंतर विद्यार्थ्यांचा इंटर्नशिप कालावधी वाढवलाही जाऊ शकतो. इथं फक्त इंटर्नशिप प्रोजेक्ट विद्यार्थ्यांच्या स्किल डेवलपमेंट कोर्सशी लिंक करणं अपेक्षित असेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com