करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (Government Job) असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडकडून नवीन भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे चालून आली आहे. ही ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड केंद्र शासनाची नवरत्न कंपनी आहे. तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल ते अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
भरतीचा तपशील –
ही भरती प्रक्रिया बारा रिक्त जागांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. इच्छुकांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. ही भरती प्रक्रिया करारावर आधारित असणार आहे. ही भरती प्रक्रिया कनिष्ठ सल्लागार आणि सहयोगी सल्लागार या पदांसाठी सुरू आहे.
आवश्यक वयमर्यादा – (Government Job)
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. कनिष्ठ सल्लागार आणि सहयोगी सल्लागार या दोन्ही पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 35 पेक्षा अधिक नसावे. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना तगडा पगार देखील मिळणार आहे.
अशी होईल निवड –
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची एक लिस्ट तयार केली जाईल. त्यानंतर ईमेलव्दारे उमेदवारांशी संपर्क साधला जाईल. त्यानंतर उमेदवारांच्या परीक्षा आणि (Government Job) मुलाखती घेतल्या जातील. परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातूनच उमेदवाराची निवड केली जाईल. मुलाखत आणि परीक्षा दोन्ही टप्पे महत्वाचे असणार आहेt. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अगोदर आपला अर्ज भरावा लागेल.
असा करा अर्ज –
उमेदवारांनी आपला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे [email protected] या मेलवर पाठवायचे आहेत. तसेच उमेदवारांनी अर्ज आणि कागदपत्रेही खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे. कागदपत्रे आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता – दुसरा मजला खोली क्रमांक 40 केडीएम भवन, मेहसाणा असा आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. यामुळे उमेदवारांनी या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे आणि शेवटच्या तारखेच्या अगोदर आपला अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठीअधिकृत वेबसाईट – https://ongcindia.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com