करिअरनामा ऑनलाईन । यूपीएससी (UPSC) आणि सीबीएसई (CBSE) बोर्डांसह (Study Tips) सर्व राज्यातील बोर्डांच्या परीक्षा जवळ येत आहेत. फेब्रुवारीपासून परीक्षांचा हंगाम सुरु होत आहे. परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थी अपार मेहनत घेत आहेत. तुमच्या मेहनतीला फळ मिळावं यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, जे तुमच्या अभ्यासाच्या तयारीसाठी तुम्हाला निश्चित मदत करु शकतात.
1. बुलेट पॉइंट्सचा वापर करा
जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा आपण खूप पुस्तके वाचतो. एवढा सगळा अभ्यास लक्षात ठेवणं कठीण होतं. उजळणी करताना जास्त अभ्यास करावा लागू नये यासाठी तुम्ही वाचलेल्या संकल्पना हायलाइट करा आणि ही माहिती बुलेट पॉइंटमध्ये ठेवा.
2. कीवर्ड हायलाइट करा (Study Tips)
केलेल्या अभ्यासाची उजळणी करताना तुमचा वेळ वाचवण्यासाठी ही युक्ती उपयोगी ठरू शकते. उजळणी अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वपूर्ण नियम आणि संकल्पनांवर जोर द्या. असे मुद्दे वेळोवेळी हायलाइट करुन ठेवा.
3. कलर कोडिंग
माहिती स्पष्टपणे विभक्त करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांची वेगवेगळ्या रंगामध्ये विभागणी करा.
4. सक्रिय वाचन महत्वाचे
वाचन करत असताना स्वतःच्या शब्दात सारांश तयार करा आणि विषय तोंडपाठ करण्यापेक्षा मुद्दा समजून घेवून वचन करण्याकडे (Study Tips) लक्ष द्या.
5. नियमितपणे उजळणी करा
अभ्यास पक्का करण्यासाठी आणि दीर्घकाळ लक्षात ठेवण्यासाठी तुमच्या टाईम टेबळमध्ये उजळणी करण्याला वेळ द्या.
6. डिजिटल किंवा भौतिक संसाधने
कोणतेही दडपण घेवू नका. जेव्हा तुम्ही (Study Tips) अभ्यास करता तेव्हा आरामात अभ्यास करा, दबावाखाली राहू नका. अभ्यास सुरू करण्यापूर्वी स्वत:ला 5 मिनिटे द्या आणि (Study Tips) स्वत:ला अभ्यासासाठी तयार करा. तुमच्या पसंतीनुसार डिजिटल टूल्स किंवा पारंपारिक नोटबुक यापैकी एक निवडा, उत्तम रिझल्ट मिळावा यासाठी अभ्यासात सातत्य ठेवा.
कधी होणार परीक्षा?
UPSC CSE प्रिलिम्स परीक्षा दि. 26 मे 2024 रोजी होणार आहे, तर CBSE बोर्डाच्या परीक्षा दि. 15 फेब्रुवारी ते दि. 2 एप्रिल 2024 या कालावधीत होणार आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com