Entrance Exam Schedule : MHT CET, CUET UG, NEET UG परीक्षांच्या प्रवेश प्रक्रियेविषयी महत्वाची अपडेट

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची (Entrance Exam Schedule) अपडेट हाती आली आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये नवीन सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. अभियांत्रिकी (Enginerring), वैद्यकीय (Medical) आणि फार्मसी (Pharmacy) यासारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी जानेवारी 2024 मध्ये सुरू होणार आहे.
यामध्ये जेईई मेन सेशन-1 (JEE Main Session 1) ची परीक्षा 24 जानेवारीपासून सुरू होणार आहे. जेईई मेनसाठी नोंदणी आधीच झाली आहे. तर CUET PG 2024 साठी नोंदणी प्रक्रिया 26 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाली आहे. जानेवारी महिन्यात ज्या परीक्षांसाठी नोंदणी सुरू होणार आहे त्यांची सविस्तर माहिती पाहूया.

1. महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षा (MHT CET)
महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रवेश परीक्षा (MHT CET) द्वारे आयोजित केली जाते. MHT CET 2024 परीक्षेसाठी (Entrance Exam Schedule) नोंदणी जानेवारी महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. MHT CET 2024 परीक्षा 16 एप्रिल ते 5 मे 2024 या कालावधीत घेण्यात येईल. याविषयी अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org ला भेट देऊन अधिक माहिती जाणून घ्या.

2. CUET UG 2024 (Entrance Exam Schedule)
केंद्रीय विद्यापीठ आणि अनेक राज्य विद्यापीठांमधील प्रवेश हे कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट अंडरग्रेजुएट (CUET 2024) च्या स्कोअरवर आधारित आहेत. CUET UG 2024 परीक्षा 15 मे ते 31 मे 2024 या कालावधीत होणार आहे. त्यासाठीची नोंदणी प्रक्रियाही जानेवारी महिन्यातच सुरू होणार आहे.
3. NEET UG 2024
NEET UG ही पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षा आहे. याद्वारे एमबीबीएस (MBBS) आणि बीडीएस (BDS) सारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. NEET UG NTA द्वारे ही परीक्षा आयोजित केली जाते. NEET UG 2024 ची परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया जानेवारीच्या अखेरीस सुरू होण्याची (Entrance Exam Schedule) शक्यता आहे. अधिक माहितीसाठी, तुम्ही NEET UG 2024 neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जावून माहिती घेवू शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com